शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंच्या वाडेकरांनी मारला बाण

By admin | Updated: September 28, 2014 00:21 IST

कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून आज सुमारे 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून आज सुमारे 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात आज शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष तसेच भारीप बहुजन महासंघाच्या उमेदवारांचा समावेश आहे. या मतदारसंघातून एकूण 23 उमेदरावांचे सुमारे 36 अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाच्या परशुराम वाडेकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना संधी देण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रमेश बागवे यांनी कॉंग्रेसकडून तर मनसेकडून नगरसेवक अजय तायडे यांनी अर्ज दाखल केलेला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसकडून भगवान वैराट यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. मात्र, आज अचानक पक्षाकडून नगरसेविका हिना मोमीन यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली.  त्यांनाही एबी फॉर्म देण्यात आला. या दोन्ही उमेदवारांनी आज आपले अर्ज भरले तसेच एबी फॉर्मही भरले आहेत. दुपारी तीन पूर्वी आलेल्या उमेदवारांना टोकण देऊन रांगेत थांबविण्यात आले होते. त्यामुळे अर्ज भरण्यासाठीचे काम सुमारे चार र्पयत सुरू होते. आज दिवसभरात, परशुराम वाडेकर ( शिवसेना),दिलीप कांबळे ( भाजप) नरेश इंद्रसेन जाधव (राष्ट्रवादी), मोहन लक्ष्मण सोनवणो ( राष्ट्रवादी) रमण घोरपडे (अपक्ष), मिलिंद अहिरे ( बसप), संदीप कांबळे ( अपक्ष), नितीन डुबेकर (बसप), सतिश लांडगे ( अपक्ष), भगवान वैराट (राष्ट्रवादी), विनोद साळवे  ( अपक्ष) शैलेंद्र जाधव (अपक्ष)नवनाथ कांबळे ( रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया) लक्ष्मण जावळे (अपक्ष), हिना शफीक मोमीन (राष्ट्रवादी), गंगाधर आंबेडकर ( बहुजन भक्ती पक्ष), गौतम बापू लेखंडे ( अपक्ष) , प्रशांत म्हस्के (अपक्ष)