पुणे : पती-पत्नी या दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिला. त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारल्याने पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी, एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ४७ वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी बुधवारी (दि. १५) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पत्नी-पती आहे. त्या दोघांच्या नावावर वारजे येथील सारर्थ सिन्क्लेअर येथे फ्लॅट आहे. तो फ्लॅट विकण्याबाबत चर्चा सुरू होती. फिर्यादी यांनी हा फ्लॅट विकण्याबाबत नकार दिला. या फ्लॅट विकण्याबाबत कोणतीही सही करणार नाही, असे बोलल्या. तेव्हा पतीने पत्नीला मोठमोठ्याने शिवीगाळ केली. पत्नीच्या नाकावर उजव्या हाताच्या पंज्याच्या मुठीने जोरात बुक्की मारली. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. पतीच्या मारहाणीत त्यांचे नाक फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या आहेत. पोलिस हवालदार शिंदे पुढील तपास करत आहेत.
Web Summary : In Pune, a husband fractured his wife's nose after she refused to sign documents to sell their shared flat. The 45-year-old woman filed a complaint, leading to a police case against the 47-year-old husband for the assault at their home.
Web Summary : पुणे में, एक पति ने पत्नी के फ्लैट बेचने के कागजात पर हस्ताक्षर करने से इनकार करने पर उसकी नाक तोड़ दी। 45 वर्षीय महिला ने शिकायत दर्ज कराई, जिसके बाद 47 वर्षीय पति के खिलाफ घर पर हमले का मामला दर्ज किया गया।