Pune: "तिने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झालाय..."; विवाहितेच्या मृत्युप्रकरणी नातेवाइकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:33 IST2023-07-22T17:24:51+5:302023-07-22T17:33:36+5:30

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

rakhi ghogare not ended her she was murdered; Allegations of relatives in the case of the death of the married | Pune: "तिने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झालाय..."; विवाहितेच्या मृत्युप्रकरणी नातेवाइकांचा आरोप

Pune: "तिने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झालाय..."; विवाहितेच्या मृत्युप्रकरणी नातेवाइकांचा आरोप

खेड शिवापूर (पुणे) : राखी सतीश घोगरे (वय ३०) शेंडकरवस्ती ( ता. हवेली ) या विवाहितेचा मृतदेह शुक्रवार ( दि. १४ ) रोजी घराशेजारील विहिरीमध्ये आढळून आला. पोलिसांनी बायडाबाई विष्णू घोगरे (सासू), सतीश विष्णू घोगरे (नवरा) (दोन्ही रा. आर्वी शेंडकरवस्ती ( ता. हवेली ) यांच्यावर खेड शिवापूर पोलिस चौकीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला होता.

मात्र तिच्या माहेरकडच्या लोकांना तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झालेला आहे, असा संशय असल्याने त्यांनी राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्याकडे धाव घेतली.

वरिष्ठ पोलिसात अधिकाऱ्यांना विवाहितेच्या नातेवाइकांनी अनेक संशयास्पद गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. त्याचबरोबर तशा प्रकारचे निवेदनही पोलिस निरीक्षकांना नातेवाइकांकडून देण्यात आले. या निवेदनात अनेक गोष्टी नमूद असून राखी हिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तशा प्रकारचा गुन्हा सदर मृतविवाहितेच्या पती व सासूवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फिर्यादी कमल घोलप यांनी तक्रारीत केली आहे.

Web Title: rakhi ghogare not ended her she was murdered; Allegations of relatives in the case of the death of the married