पुणे ते खरगपूर, हडपसर ते आसनसोल दरम्यान विशेष गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:08 IST2026-04-23T18:08:40+5:302026-04-23T18:08:56+5:30
यामध्ये गाडी क्रमांक ०१४५५ पुणे-खरगपूर विशेष गाडी शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी पुण्याहून ३.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:४० वाजता खरगपूरला पोहोचेल.

पुणे ते खरगपूर, हडपसर ते आसनसोल दरम्यान विशेष गाडी
पुणे : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी पुणे विभागीय मध्य रेल्वेने पुणे विभागातून सुटणाऱ्या अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाड्या विशेष शुल्कावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गाडी क्रमांक ०१४५५ पुणे-खरगपूर विशेष गाडी शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी पुण्याहून ३.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:४० वाजता खरगपूरला पोहोचेल.
या गाडीचे थांबे दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर (अहमदनगर), कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर आणि टाटानगर असणार आहेत. तर ट्रेन क्र. ०१४५९ हडपसर-आसनसोल विशेष शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता हडपसरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ०२ वाजता आसनसोलला पोहोचेल.
या गाडीचे थांबे दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर (अहमदनगर), कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चाैकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, सासाराम, देहरी ऑन सोन, गया, कोडरमा, पारसनाथ, धनबाद आणि चित्तरंजन असणार आहेत.