शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:26 IST

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले

पुणे : कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आल्याची चर्चा होती. मात्र आज पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुण्यातील बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या वादग्रस्त जमीन व्यवहारावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते.ते पुढे म्हणाले, मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरण वेगवेगळे आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यावेळी पत्रकार परिषदेत पोलिसांकडून  बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि  शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध  नसल्याचे स्पष्ट केले. कागद पत्रांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

दरम्यान , कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ या कंपनीचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणाचे राजकीय परिणाम दिसून येऊ शकतात. विरोधकांनी या प्रकरणावरून जोरदार टीका सुरू केली असून, पवार कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जनतेसमोर त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parth Pawar, Sheetal Tejwani Cleared in Land Scam Case: Police

Web Summary : Pune police clear Parth Pawar and Sheetal Tejwani's names from the Bopodi land scam. Investigation reveals no direct involvement of Pawar's 'Amedia Enterprises'. Earlier, Koregaon Park land deal raised political concerns.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवार