Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?

लखनौच्या इकाना स्टेडियमवर घडलेल्या हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

By सुशांत जाधव | Updated: April 26, 2026 20:47 IST

Open in App

KKR Angkrish Raghuvanshi Dismissed For Obstructing The Field Against LSG :  कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी रविवारी लखनौ सुपर जाएंट्सविरुद्धच्या सामन्यात दुर्मीळ पद्धतीने ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ नियमाखाली बाद घोषित करण्यात आले. पंचांच्या निर्णयावर युवा बॅटरसह केकेआरच्या ताफ्यातही नाराजी पाहायला मिळाली. लखनौच्या इकाना स्टेडियमवर घडलेल्या हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नेमकं काय घडलं? 

कोलकाताच्या डावाच्या पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रघुवंशीने चेंडू मिड-ऑनच्या दिशेने खेळत धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्ध्या खेळपट्टीवरून तो परत माघारी फिरला. क्रीजमध्ये परतताना त्याने धावण्याची दिशा बदलली आणि त्याचवेळी मोहम्मद शमीनं स्टंपच्या दिशेनं थ्रो केलेला चेंडू त्याच्या पायावर लागला.

पंतच्या अपीलनंतर निर्णय

लखनौचा कर्णधार रिषभ पंत आणि संघाने लगेच ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डची अपील केली. तिसरे पंच रोहन पंडित यांनी रिप्ले पाहिल्यानंतर रघुवंशीने धावताना अडथळा निर्माण करण्यासाठी दिशा बदलल्याचे आढळल्याने त्याला आउट घोषित केले. या निर्णयानंतर रघुवंशी स्पष्टपणे नाराज दिसला. मैदानाबाहेर जाताना त्याने रागही व्यक्त केला. नियमानुसार पंचांनी दिशा बदलल्याच्या आधारावर केकेआरच्या बॅटरची दिलेली विकेट योग्यच आहे. पण या क्षणी पंतनं खिलाडूवृत्ती जपण्यापेक्षा नियमाच्या आधारे युवा बॅटरला तंबूचा रस्ता दाखवण्याला पसंती दिली. ही गोष्टही विचार करायला लावणारी आहे. खेळभावना जपत जर LSG नं अपील केली नसती तर हा वादच पेटला नसता.

दुर्मिळ पद्धतीने बाद होणारा IPL इतिहासातील चौथा फलंदाज

रघुवंशी हा आयपीएलमध्ये ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डमुळे बाद होणारा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी  युसुफ पठाण, अमित मिश्रा आणि रवींद्र जडेजा या पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Controversial Wicket: Pant's sportsmanship questioned after Raghuvanshi's rare dismissal in KKR vs LSG.

Web Summary : Angkrish Raghuvanshi's 'obstructing the field' dismissal against LSG sparked controversy. Replays showed Raghuvanshi changed direction, leading to the out decision after Pant's appeal. The dismissal ignited debate about sportsmanship versus strict adherence to rules, making it a talking point.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स