शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 05:35 IST

प्रकल्पातील बोगद्यांना गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतिकृतीप्रमाणे सजवण्यात आले आहे

मुंबई - यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर ६ किमीने कमी होईल. या मार्गावर सुरुवातीच्या टप्प्यात केवळ हलकी वाहने, बसलाच प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे घाटातील वाहतूककोंडी  कमी होईल. या रस्त्यावर टोलवाढ होणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पूर्णतः ‘ॲक्सेस कंट्रोल’ बनविणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची उभारणी केली आहे. त्याची ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, दि. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रवासी वाहतूक ‘मिसिंग लिंक’मुळे होईल. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर तब्बल अर्ध्या तासाने कमी होणार आहे. प्रकल्पात तब्बल ८.९२ किमी लांबीचा बोगद्यात असून, यात एखादा अपघात घडून वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी सुरुवातीला अवजड वाहने आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी असेल. त्यामुळे केवळ कार आणि बसलाच प्रवेश दिला जाणार आहे.

अपघाताचे प्रमाण येणार शून्यावर नव्या मार्गामुळे घाटातील  वळणे आणि वाहतूक पूर्णपणे ‘बायपास’ होणार आहे. त्यातून अपघात जवळपास शून्यावर येतील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी व्यवस्था उभारत आहोत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

पर्यटनस्थळांच्या विकासाला पंखप्रकल्पातील बोगद्यांना गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतिकृतीप्रमाणे सजवण्यात आले आहे. प्रकल्पामुळे पुण्याजवळील पर्यटनस्थळांना पोहोचणे सहज शक्य होणार असून लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या स्थळांना अधिक चांगली जोडणी मिळणार आहे.  

केबल-स्टेड पूल ठरणार आकर्षणप्रकल्पात १३.३ किमी लांबीच्या मार्गाची उभारणी केली असून, त्यासाठी सुमारे २३.७५ मीटर रुंदीचे जगातील सर्वांत रुंद दोन बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंचीचा केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हान होते, असे उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Missing Link Opens: Shorter Route, No Toll Hike Initially.

Web Summary : The Mumbai-Pune Missing Link project reduces distance by 6 km, prioritizing cars and buses initially. No toll increase is planned. The project, featuring tunnels and cable-stayed bridges, aims to cut travel time by half an hour and reduce accidents.
टॅग्स :Mumbai Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेEknath Shindeएकनाथ शिंदे