शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 08:45 IST

1 / 6
Sukanya Samriddhi Yojana Calculator: मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारांमार्फत अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. यापैकी केंद्र सरकारची 'सुकन्या समृद्धी योजना' ही अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर योजना मानली जाते.
2 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१५ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. सध्या या योजनेअंतर्गत ८.२ टक्के इतका भरघोस व्याजदर दिला जात आहे, जो देशातील मुलींसाठी असलेल्या इतर कोणत्याही योजनेच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ही योजना पूर्णपणे करमुक्त असून यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.
3 / 6
या योजनेचे नियम अतिशय स्पष्ट आहेत, ज्यानुसार केवळ १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीचं खातं उघडता येतं. या खात्यात वर्षाला किमान २५० रुपये जमा करणं अनिवार्य असून, जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.
4 / 6
गुंतवणूकदाराला १५ वर्षांपर्यंत नियमित गुंतवणूक करावी लागते आणि खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी ते मॅच्युअक होते. विशेष परिस्थितीत, जर मुलगी १८ वर्षांची झाली असेल आणि तिचं लग्न करायचं असेल, तर हे खातं मुदतीपूर्वी बंद करून सर्व रक्कम मुलीच्या बँक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
5 / 6
एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी हे खातं उघडता येतं, मात्र जुळ्या मुलींच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त मुलींनाही हा लाभ मिळू शकतो. देशातील कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे खातं उघडणं शक्य आहे.
6 / 6
परताव्याच्या गणितानुसार, जर १ वर्ष वयाच्या मुलीसाठी दरवर्षी १.५ लाख रुपये याप्रमाणे १५ वर्षे गुंतवणूक केली (म्हणजेच दरमहा १२,५०० रुपयांची बचत), तर मॅच्युरिटीच्या वेळी मुलीला ६९,२७,५७८ रुपयांचा मोठा निधी मिळू होऊ शकतो. ही योजना मुलींच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक भक्कम आधार ठरत आहे.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाGovernmentसरकार