शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 06:22 IST

लोणेरे हत्याप्रकरणाचा पाच दिवसांत छडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ३० एप्रिलपर्यंत कोठडी

अलिबाग - लोणेरे येथील तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाचा अवघ्या पाच दिवसांत उलगडा करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या धडक कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांच्या कार्यक्षम तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

२१ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील लोणेरेच्या ओमकार लॉजमध्ये ही घटना घडली होती. आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार ( ३८) याने एका २२ वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. डोक्यावर आणि दोन्ही हातांच्या मनगटावर गंभीर वार करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. 

गंभीर कलमे लावून कारवाईया प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ६४ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली.  विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.

असा सापडला आरोपीतपासादरम्यान आरोपीचा पूर्वीही गंभीर गुन्ह्यांशी संबंध असल्याची माहिती समोर आली. २०२१ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यावर भर दिला.  गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ठाणे शहर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सर्च ऑपरेशन राबवले. ठाणे शहरातील विविध लॉज, डॉरमेट्री आणि रेल्वे स्थानक परिसरात तपास करण्यात आला. 

अखेर एका डॉरमेट्रीमध्ये आरोपी राहात असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या यशस्वी कारवाईमुळे एका गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे (महाड विभाग) करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 22-Year-Old Murder Solved in 5 Days; Accused Arrested

Web Summary : Police solved the gruesome murder of a 22-year-old woman in Loner within five days, arresting the accused, Anis Mohammadkhan Maldar, from Thane. He brutally murdered the woman with a sickle. The accused is in police custody until April 30th.
टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी