शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 20:10 IST

ही घटना स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ (होमलँड प्लॅटफॉर्म) येथे घडली. मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. शासकीय रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत युवक भिकारी किंवा मनोरुग्ण असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर :  रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी एका युवकाने अचानक फलाटावर उभी असलेल्या ट्रेनवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याला जबर विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे तो खाली कोसळला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.ही घटना स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ (होमलँड प्लॅटफॉर्म) येथे घडली. मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. शासकीय रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत युवक भिकारी किंवा मनोरुग्ण असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३५ वर्षांचा एक युवक रविवारी दुपारी नागपूर स्थानकावर आला होता. दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास तो होमलँड प्लॅटफॉर्मच्या गुड्स सायडिंगवर उभी असलेल्या कोळसा भरलेल्या मालगाडीवर अचानक चढला. मात्र, काही क्षणांतच तो ट्रेनच्या वर असलेल्या ओएचई वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याला तीव्र विजेचा धक्का बसून तो खाली पडला. जवळ जाऊन पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले.दरम्यान, या घटनेत ओएचई वायर तुटल्याने काही काळ विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. माहिती मिळताच ओएचई पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दुरुस्तीचे काम पूर्ण केले.त्यानंतर रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी सांगितले की, मृताची ओळख अद्याप पटलेली नसून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यूrailwayरेल्वेelectricityवीज