अकोला : उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात ४६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे. अकोल्यापाठोपाठ सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक आहे.
विदर्भात गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट सुरू आहे. सातत्याने देशातील सर्वाधिक तापमान अकोला आणि विदर्भातील काही प्रमुख शहरांमध्ये नोंदवले जात आहे. रविवारी तर या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक गाठला गेला. गेल्या दशकभरातील सर्वाधिक तापमानाच्या उंबरठ्यावर यावर्षीचे तापमान येऊन पोहोचले असून, अशीच परिस्थिती काही काळ कायम राहिल्यास या दशकातील तापमानाचा उच्चांक मोडण्याची शक्यता आहे.
असे होते विदर्भातील रविवारचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :अकोला : ४६.९अमरावती : ४६.८वर्धा : ४६.४यवतमाळ : ४६.०नागपूर : ४५.४चंद्रपूर : ४५.०वाशिम : ४४.६गडचिरोली : ४४.६गोंदिया : ४४.४ब्रह्मपुरी : ४४.२भंडारा : ४४.०बुलढाणा : ४३.५
Web Summary : Vidarbha reels under intense heatwave, with Akola recording the highest temperature in the country at 46.9°C. Other cities like Amravati, Wardha, and Nagpur also experienced extremely high temperatures, nearing record levels for the decade. The heatwave is expected to persist.
Web Summary : विदर्भ भीषण गर्मी की लहर से जूझ रहा है, अकोला में देश का सबसे अधिक तापमान 46.9 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। अमरावती, वर्धा और नागपुर जैसे अन्य शहरों में भी अत्यधिक उच्च तापमान का अनुभव हुआ, जो दशक के रिकॉर्ड स्तर के करीब है। गर्मी की लहर जारी रहने की उम्मीद है।