How Mohammed Shami Transformed LSG Pacer Mohsin Khan : लखनौचा जलदगती गोलंदाज मोहसिन खान याने लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात आपल्या गोलंदाजीतील धार दाखवत कोलकाता नाईट रायडर्सचा अर्धा संघ तंबूत धाडला. अजिंक्य रहाणे, टिम सिफर्ट, कॅमरून ग्रीन, रोव्हमन पॉवेल आणि अनुकूल रॉय यांच्या रुपात त्याने विक्रमी पंजा मारला. लखनौच्या संघाकडून कोणत्याही गोलंदाजाने केलेली ही सर्वोच्च कामगिरी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस; तर..."
पण तुम्हाला माहितीये का? मोहसिन खान हा टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीच्या तालमीत घडलेला गोलंदाज आहे. "फक्त जिम करून जलदगती गोलंदाजाच्या रुपात छाप सोडता येणार नाही. तुला नेट्समध्ये गोलंदाजीचा सरावही करावा लागेल, असा सल्ला शमीनं त्याला दिला. हा सल्ला मनावर घेत या पठ्ठ्यानं नेट्समध्ये घाम गाळला. आता तो IPL मध्ये आपली धमक दाखवताना दिसतोय.
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानातून दूर राहण्याची वेळ
डावखुऱ्या हाताने जलगती गोलंदाजी करणारा मोहसिन खान हा सातत्यपूर्ण १४० किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. २०२२ च्या आयपीएल हंगामात १० सामन्यांत १४ विकेट्स घेत त्याने टीम इंडियात एन्ट्री मारण्यासाठी शड्डू ठोकला होता. पण दुखापतीमुळे त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. खांद्याची दुखापत, ग्रोइन इंज्युरी आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
दुखापतीतून सावरून आपल्या गोलंदाजीची धार दाखवणाऱ्या मोहसिनच्या पुनरागमनात मोहम्मद शमीची मोठी भूमिका राहिली आहे. लॉकडाऊनदरम्यान मोहसिन याने शमीच्या फार्महाऊसवर राहून त्याच्यासोबत सराव करण्याला पसंती दिली. ६ फूट ३ इंच उंची असलेला हा गोलंदाज अधिक काळ जिममध्ये घालवायचा. पण शमीनं त्याला स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जिममध्ये जाऊन शरीर बनेल, पण गोलंदाजीत सुधारणा होणार नाही. त्यासाठी तुला नेट्समध्ये अधिकाधिक सराव करावा लागेल. हाच सल्ला मोहसिनसाठी टर्निंग पॉइंट ठरला.
दोघेही LSG च्या ताफ्यातून उतरतात मैदानात
मोहसिन खानसह भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी हा देखील लखनौच्या ताफ्यात आहे. स्वत: टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी धडपडत असलेला शमी या युवा गोलंदाजाला टीम इंडियाकडून खेळायचंय ना? मग अजून जोर लाव...असे म्हणत आजही सरावादरम्यान त्याला बूस्ट देतो.
Web Summary : Mohsin Khan's impressive bowling is credited to Mohammed Shami's guidance. Shami advised him to focus on net practice over just gym workouts. Overcoming injuries, Mohsin honed his skills at Shami's farm, leading to his IPL success. Shami continues to motivate him.
Web Summary : मोहसिन खान की शानदार गेंदबाजी का श्रेय मोहम्मद शमी के मार्गदर्शन को जाता है। शमी ने उन्हें जिम की बजाय नेट प्रैक्टिस पर ध्यान केंद्रित करने की सलाह दी। चोटों से उबरकर, मोहसिन ने शमी के फार्म पर अभ्यास किया, जिससे उन्हें आईपीएल में सफलता मिली। शमी लगातार उसे प्रेरित करते हैं।