पाकिस्तानातीलदहशतवाद्यांमध्ये सध्या 'अज्ञाता'ची जबरदस्त दहशत माजली आहे. हल्ला करणारी ही व्यक्ती दहशतवाद्यांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरत आहेत. कुण्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा रविवारी गोळ्या घालून गेम ओव्हर केला. युसूफ हा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लष्करच्या नेटवर्कचा ब्रांच हेड होता. यमदूत बनून आलेल्या या अज्ञात हल्लेखोरांनी युसूफचा क्षणात खात्मा केला.
पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये 'अज्ञाता'ची दहशत -महत्वाचे म्हणजे, हे 'अज्ञात' हल्ले करणारे कुठूण येतात आणि कुठे गायब होतात हे अद्यापही कळू शकलेले नाही. पंजाब, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वापासून ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत (PoK) भारतविरोधी कारस्थानं रचणारे दहशतवादी आता कुठेही सुरक्षित नाहीत. कधी काळी छाती फुगवून वावरणारे हे दहशत वादी आता स्वतःच दहशतीत वावरताना दिसत आहेत.
पाकिस्तान लष्कराची आणि गुप्तचर यंत्रणांचीही झोप उडाली -पाकिस्तानात 'धुरंधर' आणि 'धुरंधर-२' चित्रपट रिलीज झाल्यापासून तेथील लष्कराची आणि गुप्तचर यंत्रणांचीही झोप उडाली आहे. भारताच्या शत्रूंचा एक-एक करून खात्मा होत आहे. महत्वाचे म्हणजे, २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत लाहौर, कराची आणि खैबर पख्तूनख्वामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या ३० हून अधिक टॉप कमांडर्सचा खात्मा झाला आहे. याच एप्रिल महिन्यात हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा याचाही लाहोरमध्ये गोळ्या घालून कुण्या अज्ञातांनी खात्मा केला. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणानले आहेत.
Web Summary : An 'unknown' assailant killed top Lashkar commander Yusuf Afridi in Pakistan, causing widespread panic among terrorist groups. Over 30 top commanders of LeT and Hizbul Mujahideen have been eliminated this year, unnerving Pakistan's military and intelligence agencies. The 'unknown' assailants' actions are creating fear among terrorists.
Web Summary : पाकिस्तान में 'अज्ञात' हमलावर ने लश्कर कमांडर युसूफ अफरीदी को मार गिराया, जिससे आतंकी समूहों में दहशत है। इस साल 30 से अधिक शीर्ष कमांडरों का सफाया हो चुका है, जिससे पाकिस्तानी सेना और खुफिया एजेंसियां परेशान हैं। 'अज्ञात' हमलावरों के कारण आतंकियों में डर है।