शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 18:43 IST

यावेळी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना इशारा देत म्हणाले, "जे बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून बंगालमध्ये राहत आहेत, त्यांनी २९ एप्रिलआधी देश सोडावा. अन्यथा, ४ मे नंतर प्रत्येक घुसखोराला हकलून लावले जाईल. आता तृणमूल काँग्रेस एकाही घुसखोराला वाचवू शकणार नाही."

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. आज (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला मोठी आश्वासने देत ममता बॅनर्जी सरकारवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी ममता सरकारवर घुसखोरांना आश्रय दिल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, भाजप सत्तेवर आल्यास या घुसखोरांना बाहेर काढले जाईल आणि तृणमूल काँग्रेस कुणालाही वाचू शकणार नाही, असेही मोदी म्हणाले. ते बनगांव येथे जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना इशारा देत म्हणाले, "जे बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून बंगालमध्ये राहत आहेत, त्यांनी २९ एप्रिलआधी देश सोडावा. अन्यथा, ४ मे नंतर प्रत्येक घुसखोराला हकलून लावले जाईल. आता तृणमूल काँग्रेस एकाही घुसखोराला वाचवू शकणार नाही."

शरणार्थी कुटुंबांना हक्काची जागा देणार - पश्चिम बंगालमधील मतुआ, नामशूद्र आदी शरणार्थी कुटुंबांना आश्वासन देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला केवळ नागरिकताच मिळणार नाही तर हक्काचा पत्ता, भारतीय नागरिकाला मिळणारे सर्व हक्क आणि कागदपत्रेही मिळतील. ही 'मोदींची गॅरंटी' आहे. 

मोदी पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने गंगेचे उगमस्थान गंगोत्री आहे, त्याच प्रकारे भाजपचे मुळ जनसंघ आहे आणि जनसंघाचे उगमस्थान बंगाल आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधूनच जनसंघाचे खाते उघडले होते. तेव्हा कोलकात्यातून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी निवडून आले होते. दरम्यान जेव्हा फाळणी झाली, तेव्हा जनसंघ पूर्वबंगालमधील शरणार्थींसोबोत ठामपणे उभा होता. असेही मोदी म्हणाले.

महिलांसाठीही मोठ्या घोषणां -यावेळी डबल इंजिन सरकारमुळे बंगालच्या लेकींना दुप्पट फायदा होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. त्यांनी पश्चिम बंंगालमधील स्त्री शक्तीलाही मोठी गॅरंटी दिली. भाजपचे सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरवर्षी ३६००० रुपये जमा केले जातील. तसेच, मुलींना सरकारी नोकरीत ३३ टक्के आरक्षण दिले जाईल. याच बरोबर, अंगणवाडी सेविका आणि महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाबासंदर्भातही मोठी घोषणा करण्यात आली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Modi Promises ₹36000 for Women, Expulsion of Illegal Immigrants in Bengal.

Web Summary : In West Bengal, Modi promised to expel illegal immigrants after May 4th if BJP wins. He assured citizenship and rights for refugees and financial assistance of ₹36000 annually for women, plus 33% job reservation for women.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक 2026Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी