युरिया साठ्यामध्ये तफावत आढळल्याने जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:09 IST2026-04-19T15:08:48+5:302026-04-19T15:09:22+5:30

परवाना निलंबित करण्यात आलेल्या दुकानदारांमध्ये सात जण दौंड तालुक्यातील आहेत.

pune news Licenses of 15 agricultural service centers in the district suspended after discrepancies were found in urea stocks | युरिया साठ्यामध्ये तफावत आढळल्याने जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

युरिया साठ्यामध्ये तफावत आढळल्याने जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

पुणे : पॉस प्रणाली व प्रत्यक्षात असलेल्या युरिया साठ्यामध्ये तफावत आढळल्याने जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांना निलंबन कालावधीत सर्व प्रकारच्या खतविक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी निलंबित केलेल्या विक्रेत्यांकडून खते न घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. परवाना निलंबित करण्यात आलेल्या दुकानदारांमध्ये सात जण दौंड तालुक्यातील आहेत.

जिल्ह्यातील युरिया खताच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून जिल्ह्यातील विक्रेत्यांची १ एप्रिलपासून युरिया खताचा पॉस मशीनवरील साठा व प्रत्यक्षात विक्री केंद्रातील साठा याची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेमध्ये ३५०० टन युरिया खताचा साठा पॉस प्रणालीवरून कमी करण्यात आलेला आहे. यामुळे खरीप हंगामात खताची वस्तुनिष्ठ उपलब्धता व पुरवठा नियोजन करण्यास जिल्हा कार्यालयास मदत होणार आहे. खतविक्रेत्यांना अनेकदा संधी देऊनही वेळेत कार्यवाही न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पॉस मशीन प्रणालीद्वारे प्रत्यक्षात युरियाची विक्री करूनही साठा अद्ययावत न करता तो जुनाच ठेवल्याने माहिती मिळण्यात तफावत दिसून आली. त्यामुळे अद्ययावत युरिया खतांचा साठा न केल्यामुळे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती काचोळे यांनी दिली. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांना निलंबन कालावधीत सर्व प्रकारच्या खतविक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निलंबित केलेल्या विक्रेत्यांकडून खते न घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 परवाने निलंबित झालेली तालुकानिहाय कृषी सेवा केंद्रे

दौंड : अदिती कृषी सेवा केंद्र- लिंगाळी, बळीराजा ॲग्रो एजन्सी- देऊळगाव राजे, शिवकृपा ॲग्रो एजन्सी- पिंपळगाव, नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस- नंदादेवी, बिरोबा कृषी सेवा केंद्र- बिरोबावाडी, श्रीराम कृषी भंडार- हिंगणी बेर्डे, श्रीनाथ ॲग्रो सर्व्हिसेस- राहू. इंदापूर : महेश फर्टिलायझर-आगोती नंबर १, गणेश ॲग्रो एजन्सी- कळस. शिरूर : विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र- मांडवगण फराटा. जुन्नर : विघ्नहर कृषी सेवा केंद्र- नारायणगाव, कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी- जुन्नर. भोर : श्री भैरवनाथ शेती भांडार, वेळू. आंबेगाव शेतकरीराजा कृषी उद्योग- गावडेवाडी.

Web Title: pune news Licenses of 15 agricultural service centers in the district suspended after discrepancies were found in urea stocks