बारामती : विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाच्या पार्श्वभूमीवर जय पवार पुन्हा कामाला लागले आहेत. पोटनिवडणुकीनंतर जय पवार ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. पवार यांनी जनसंवादाला प्राधान्य दिले.
मंगळवारी सकाळी १०:३० वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ५ वाजेपर्यंत अखंड सुरू राहिली. सुमारे ६ तास ३० मिनिटांच्या या मॅरेथॉन संवादात दोन जिल्हा परिषद गट आणि माळेगाव नगरपंचायतीतील कार्यकर्त्यांशी थेट चर्चा करण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना, अपेक्षा आणि सूचनांना मनापासून ऐकून घेण्यात आले.
प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधत त्यांच्या सहभागाला महत्त्व देणे, हीच प्रभावी नेतृत्वाची खूण असल्याचे यातून दिसून आले. जय पवारांच्या या उपक्रमातून विजय साजरा करण्यापेक्षा जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तत्काळ कामाला लागणे, हीच खरी नेतृत्वाची जबाबदारी असल्याचा संदेश पवार यांनी दिला.
Web Summary : Following Sunetra Pawar's victory, Jai Pawar is actively engaging with constituents. He held a six-hour meeting, listening to concerns and expectations from party workers. Pawar emphasized fulfilling public aspirations over mere victory celebrations, highlighting the responsibility of leadership.
Web Summary : सुनेत्रा पवार की जीत के बाद, जय पवार सक्रिय रूप से निर्वाचन क्षेत्र के लोगों से जुड़ रहे हैं। उन्होंने छह घंटे की बैठक की, जिसमें पार्टी कार्यकर्ताओं की चिंताओं और अपेक्षाओं को सुना। पवार ने जीत के जश्न से ज्यादा जनता की आकांक्षाओं को पूरा करने पर जोर दिया, नेतृत्व की जिम्मेदारी को उजागर किया।