टँकर पॉईंटवर आता होणार चालकांची ब्रेथ ॲनालायझर चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:01 IST2026-04-14T10:01:17+5:302026-04-14T10:01:56+5:30

- शहरात मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र, टँकरचालक बेदरकारपणे टँकर चालवत असल्याने यामुळे अपघात वाढले आहेत.

pune news breath analyzer test of drivers will now be conducted at tanker points | टँकर पॉईंटवर आता होणार चालकांची ब्रेथ ॲनालायझर चाचणी

टँकर पॉईंटवर आता होणार चालकांची ब्रेथ ॲनालायझर चाचणी

पुणे : शहरात टँकरमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. काही दुर्घटनांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. यापुढे टँकर पॉइंटवर चालकांची ब्रेथ ॲनालायझर चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानंतरच त्याला टँकर चालविण्याची परवानगी दिली जाणार आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र, टँकरचालक बेदरकारपणे टँकर चालवत असल्याने यामुळे अपघात वाढले आहेत. महापालिकेकडून सध्या सुमारे १ हजार ५०० टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय ९० खासगी टँकरही या व्यवस्थेत सहभागी आहेत. शहरभरात ८ फीडर पॉइंटवरून दररोज अंदाजे १ हजार ६०० टँकरमार्फत पाणी वितरण केले जाते. मात्र, या मोठ्या प्रमाणातील टँकर वाहतुकीमुळे रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेषतः भरधाव वेग, बेफिकीर वाहनचालक आणि काही वेळा मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या घटनांमुळे अपघात घडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतूक शाखेशी चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्व टँकर फीडर पॉइंटवर चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशन केलेले चालक आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून, संबंधित टँकर सेवाही तत्काळ बंद करण्यात येईल.

Web Title : पुणे: टैंकर चालकों को पानी के बिंदुओं पर ब्रेथलाइजर परीक्षण का सामना करना पड़ेगा।

Web Summary : पुणे में बढ़ते टैंकर दुर्घटनाओं के कारण सख्त कार्रवाई। नगरपालिका अब टैंकर बिंदुओं पर चालकों का ब्रेथलाइजर परीक्षण करेगी, जिससे नशे में गाड़ी चलाने वालों को रोका जा सकेगा। अपराधियों के खिलाफ कार्रवाई की जाएगी, और उनकी टैंकर सेवा बंद कर दी जाएगी।

Web Title : Pune: Tanker drivers to face breathalyzer tests at water points.

Web Summary : Rising tanker accidents in Pune prompt strict action. The municipality will now conduct breathalyzer tests on drivers at tanker points, preventing drunk drivers. Action will be taken against offenders, and their tanker service will be stopped.