कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 06:16 IST2026-04-15T06:15:43+5:302026-04-15T06:16:06+5:30

Assam Assembly Election 2026: आसाम जातीय परिषदेच्या (एजेपी) उमेदवार कुंकी चौधरी यांच्या मातोश्री सुजाता गुरुंग चौधरी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान खोटे, निराधार व द्वेषपूर्ण विधान केल्याचा आरोप करीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

Assam Assembly Election 2026: Kunki Chaudhary's mother files complaint against Himanta Sarma, alleging derogatory remarks | कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप

कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप

गुवाहाटी  : आसाम जातीय परिषदेच्या (एजेपी) उमेदवार कुंकी चौधरी यांच्या मातोश्री सुजाता गुरुंग चौधरी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान खोटे, निराधार व द्वेषपूर्ण विधान केल्याचा आरोप करीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

चौधरी यांनी ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीत दावा केला की सरमा यांची विधाने त्यांना बदनाम करण्यासाठी व गुवाहाटी सेंट्रलमधून असम जातीय परिषद उमेदवाराला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी केलेली होती. खोटा प्रचार करून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. 

दरम्यान, सरमा यांनी या तक्रारीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. २ एप्रिल रोजी भाजप नेते सरमा यांनी दावा केला होता की सुजाता चौधरी यांनी काही आक्षेपार्ह पोस्टच्या माध्यमातून वादग्रस्त टिप्पणी केली होती. यामुळे सनातनी विचारांच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

आसाममध्ये १२६ विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. यादरम्यान, प्रचारकाळात झालेल्या आरोपांवरून कुंकी चौधरी यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

Web Title : कुंकी चौधरी की माँ ने हिमंत सरमा के खिलाफ अपमानजनक टिप्पणी की शिकायत की।

Web Summary : असम जातीय परिषद की उम्मीदवार कुंकी चौधरी की माँ सुजाता गुरुंग चौधरी ने असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा के खिलाफ राष्ट्रीय महिला आयोग में शिकायत दर्ज कराई, जिसमें चुनाव प्रचार के दौरान झूठे और मानहानिकारक बयान देने का आरोप लगाया गया। उनका दावा है कि सरमा के बयान उन्हें बदनाम करने और राजनीतिक रूप से उनकी बेटी को निशाना बनाने के उद्देश्य से थे।

Web Title : Kunki Choudhary's mother complains against Himanta Sarma for derogatory remarks.

Web Summary : Sujata Gurung Choudhary, mother of Assam Jatiya Parishad candidate Kunki Choudhary, filed a complaint with the National Women's Commission against Assam CM Himanta Biswa Sarma, alleging false and defamatory statements during election campaigning. She claims Sarma's statements aimed to defame her and politically target her daughter.