पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 06:29 IST2026-04-15T06:29:06+5:302026-04-15T06:29:43+5:30

West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य विधानसभेच्या २९४ जागांसाठी एकूण २,९२६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले.

West Bengal Assembly Election 2026: The fate of 2,926 people is at stake in 294 constituencies in West Bengal, voting will be held in two phases | पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान

पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य विधानसभेच्या २९४ जागांसाठी एकूण २,९२६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले.

याबाबत जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार पहिल्या टप्प्यात १५२ मतदारसंघांमध्ये १,४७८ उमेदवार रिंगणात असून दुसऱ्या टप्प्यात १४२ मतदारसंघांत १,४४८ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदार करतील. दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल होती. १० एप्रिल रोजी अर्जांची छाननी झाली आणि १३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आता पुढील टप्प्यात मतदान प्रक्रियेसाठी आयोगाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. 

‘ईसीआयनेट’चा वापर : आयोगाने आपल्या पारदर्शकताविषयक उपाययोजनांचा पुनरुच्चार केला असून, ‘ईसीआयनेट’ या मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे मतदारांना उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि मालमत्ता यांसह इतर तपशील पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित झाले आहे.

Web Title : पश्चिम बंगाल: २९४ जागांसाठी २९२६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Web Summary : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेतल्यावर २९४ जागांसाठी २९२६ उमेदवार उभे आहेत. पहिल्या टप्प्यात १५२ मतदारसंघात १४७८, तर दुसऱ्या टप्प्यात १४२ मतदारसंघात १४४८ उमेदवार आहेत. ईसीआय ॲपद्वारे मतदारांना उमेदवारांची माहिती मिळेल.

Web Title : पश्चिम बंगाल: 294 सीटों के लिए 2926 उम्मीदवार मैदान में

Web Summary : पश्चिम बंगाल चुनाव में नामांकन बंद होने के बाद 294 विधानसभा सीटों के लिए 2926 उम्मीदवार मैदान में हैं। पहले चरण में 152 निर्वाचन क्षेत्र में 1478 उम्मीदवार हैं, जबकि दूसरे में 142 निर्वाचन क्षेत्र और 1448 उम्मीदवार हैं। मतदाता ईसीआई के मोबाइल ऐप के माध्यम से उम्मीदवार विवरण तक पहुंच सकते हैं।