शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
2
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
3
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
4
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
5
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
6
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
7
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
8
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
9
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
10
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
11
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
12
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
13
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
14
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
15
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
16
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
17
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
18
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
19
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
20
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहर २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे शहर घडवण्याकरिता केला ऐतिहासिक संकल्प..!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:15 IST

'पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स' आयोजित चर्चासत्रातील सूर; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

पुणे : पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, 'पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स' यांच्यातर्फे आयोजित प्रभावी चर्चासत्रात 'पुणे व्हिजन २०३०' अधिकृतपणे सुरू करण्यात आले. शहरातील सरकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणणारी ही सार्यकाळ पुण्याला २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे, शाश्वत आणि समावेशक शहर बनवण्याच्या सामूहिक संकल्पाचा प्रारंभ ठरली.

या चर्चासत्राला केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उद्योजक अभय भुतडा, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते.डॉ. सुधीर मेहता आणि मनोज पोचट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संवादात पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी २०३० पर्यंतच्या बदलांवर सखोल चर्चा झाली. शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, गुन्हेगारी आणि सामाजिक समावेशकता यासंबंधी अनेक सूचना मांडण्यात आल्या. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवरील आव्हानांवर भाष्य केले. रस्त्यावरील कचरा, खड्डे आणि पदपथावरील अडथळ्यांचा सामना करण्यासाठी कारवाई सुरू आहे. स्वच्छतेसाठी योजना आखल्या असून, पुणे कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यापूर्वीही पुण्यात काम करण्याचा अनुभव त्यांनी सांगितला आणि आता पुन्हा तितक्याच प्रभावीपणे काम करण्याचा मानस व्यक्त केला. चर्चासत्रात वरील सर्व मान्यवरांनी मौलिक सूचना केल्या.पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक आणि गुन्हेगारीच्या समस्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांचे प्रयत्न अधोरेखित केले."अनेक गुन्ह्यांचा छडा २४ तासांत लावला आहे.मनुष्यबळ वाढवण्यासाठी आणि नवीन पोलिस ठाण्यांसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केले आहेत. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिस कायम कटिबद्ध असून, वाहतूक समस्येवरही काम सुरू आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले. व्यावसायिकांनी दीर्घकालीन सामाजिक गुंतवणूक करणे ही काळाची गरज : उद्योजक अभय भुतडा

आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा ही क्षेत्रे केवळ मूलभूत गरजा नाहीत, तर समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया आहेत. ही जबाबदारी आता फक्त शासनाची नाही, तर प्रत्येक व्यावसायिकाने यात दीर्घकालीन सामाजिक गुंतवणूक करणे काळाची गरज असल्याचे भुतडा यांनी नमूद केले. पुण्याला २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे मॉडेल शहर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा करायला हवे. पर्यावरणाला प्राधान्य देत पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजक, प्रशासन आणि नागरिकांनी एकमेकांच्या साथीने पुढे जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे विद्यापीठाला जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवून देण्याचा मनोदय व्यक्त केला. प्राध्यापकांच्या नियुक्त्या लवकरच होणार असून, परदेशी तज्ज्ञांना शिकवण्याची संधी देण्यासाठी उद्योजकांनी विद्यापीठात निधी गुंतवणुकीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि प्रशासन यांच्यातील सहकार्य महत्त्वाचे आहे.

 पायाभूत सुविधा हव्या

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भक्कम पायाभूत सुविधांची गरज अधोरेखित केली. रिंगरोड, मेट्रो विस्तार आणि नव्या विमानतळाच्या उभारणीसारख्या प्रकल्पांची जलद आणि दर्जेदार अंमलबजावणीवर प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे. पुण्याच्या प्रगतीत नागरी विमान वाहतुकीची भूमिका वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पुणेकरांच्या सहकार्याने शहराच्या विकासात सकारात्मक बदल घडवण्याचा दृढ संकल्प आहे.

सर्वांची भागीदारी असावी

विकासासाठी नागरिक, प्रशासन, आणि उद्योगजगताचे सहकार्य अपरिहार्य असल्याचे या चर्चासत्रात अधोरेखित केले. पुणे भौगोलिकदृष्ट्या वाढत नाही, तर ते एक सजीव शहर म्हणून जागृत होत आहे. ही वाढ समावेशक, पर्यावरणपूरक असली पाहिजे, असा सूर यावेळी निघाला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrahar patilचंद्रहार पाटीलmurlidhar moholमुरलीधर मोहोळ