Pune Nasrapur Case: नसरापूर प्रकरणात नवा सस्पेन्स..!पळून जात असताना सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर दिसले बोचके

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:22 IST2026-05-08T17:18:11+5:302026-05-08T17:22:18+5:30

Pune Nasrapur Case - नसरापूर चिमुरडी अत्याचार व खून प्रकरण: आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Nasrapur Case: CCTV footage shows a bullet hole on the accused's shoulder as he was fleeing. | Pune Nasrapur Case: नसरापूर प्रकरणात नवा सस्पेन्स..!पळून जात असताना सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर दिसले बोचके

Pune Nasrapur Case: नसरापूर प्रकरणात नवा सस्पेन्स..!पळून जात असताना सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर दिसले बोचके

पुणे : नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी पळून जात असताना सीसीटीव्हीत त्याच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसून येत आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या असून, त्या एखाद्या टणक धारदार हत्याराने केल्या असल्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. याबाबतचा तपास करण्यासाठी आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायालयाने (पोक्सो) आरोपीला १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातील आरोपीला विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. त्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपीला कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यासंबंधीच्या मागणीचा अर्ज सकाळी न्यायालयात दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने कोणतीही हरकत न घेता पोलिसांच्या सोयीप्रमाणे त्याला हजर करण्याची परवानगी दिली. परंतु, पोलिसांनी आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले.

सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी न्यायालयात सांगितले की, चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर पळून जाताना सीसीटीव्हीमध्ये आरोपीच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसले आहे. त्या बोचक्यामध्ये काय आहे? ते कुठे लपवून ठेवले आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा झाल्याचे दिसत आहे. त्या जखमा टणक धारदार हत्यारामुळे झाल्याची शक्यता आहे. हे कसले हत्यार वापरले आहे? त्याबाबत तपास करायचा आहे.

आरोपीच्या हातात शेवचा पुडा दिसत आहे. हा पुडा कुठल्या दुकानातून आणला आहे. त्या दुकानदाराकडे विचारणा करायची आहे. या प्रकरणातील अजून काही महत्त्वाचे पुरावे आणि मुद्द्यांची पडताळणी बाकी असल्याने ब्रह्मे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.

Web Title : पुणे नसरापुर मामला: भागते समय सीसीटीवी में आरोपी के कंधे पर दिखा गठरी

Web Summary : नसरापुर मामले में आरोपी सीसीटीवी में गठरी के साथ दिखा, पुलिस हिरासत बढ़ी। पोस्टमार्टम रिपोर्ट में धारदार हथियार से चोट की आशंका, आगे जांच जारी। अदालत ने सबूत जुटाने के लिए 12 मई तक हिरासत बढ़ाई।

Web Title : Pune Nasrapur Case: CCTV Shows Accused Carrying Bundle While Fleeing

Web Summary : The Nasrapur accused, seen with a bundle on CCTV, faces extended police custody. Post-mortem reveals injuries possibly from a sharp weapon, prompting further investigation. Court extends custody to May 12 for evidence gathering.