पुणे महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण १३ शाळांची नावे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:47 IST2026-05-07T12:46:45+5:302026-05-07T12:47:19+5:30

महापालिकेच्या प्रशासनाने या पार्श्वभूमीवर, पालकांनी आपल्या पाल्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अशा शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन केले आहे

Pune Municipal Corporation announces list of unauthorized schools; A total of 13 schools included | पुणे महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण १३ शाळांची नावे समोर

पुणे महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण १३ शाळांची नावे समोर

पुणे : पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शहरातील १३ अनधिकृत शाळा असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती दिली आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत एकूण १३ शाळांचा समावेश आहे. यामध्ये बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव परिसरातील काही शाळांचा समावेश आहे. 

न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल(बिबवेवाडी), महात्मा गांधी प्रशाला (येरवडा), टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब (कोंढवा खुर्द), सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल (कोंढवा बुद्रुक) आणि इमॅन्युअल पब्लिक स्कूल (हडपसर), आकांक्षा अकॅडमी स्कूल (लोहगाव), एलोरा मेडिकल ॲण्ड एज्युकेशन फाउंंडेशन आर्यन पब्लिक स्कूल (मानाजी नगर), लेगसीहाय स्कूल आणि शिबलीनोमानी इंग्लिश मीडियम स्कूल (कोंढवा बुद्रुक), ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल (उंड्री), इकरा इस्लामिक स्कूल (कोंढवा), ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल (आंबेगाव) आणि आर्यन वर्ल्ड स्कूल (उंड्री) या शाळांचा समावेश आहे. महापालिकेच्या प्रशासनाने या पार्श्वभूमीवर, पालकांनी आपल्या पाल्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अशा शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन केले आहे.

Web Title : पुणे महानगरपालिका ने 13 अनधिकृत स्कूलों की सूची जारी की

Web Summary : पुणे महानगरपालिका ने शैक्षणिक वर्ष 2025-26 के लिए 13 अनधिकृत स्कूलों की पहचान की है। ये स्कूल बिबवेवाड़ी, येरवड़ा, कोंढवा, हडपसर और अन्य क्षेत्रों में स्थित हैं। अभिभावकों को शैक्षणिक वर्ष 2026-27 के लिए इन स्कूलों में अपने बच्चों का नामांकन न कराने की सलाह दी जाती है।

Web Title : Pune Municipal Corporation Releases List of 13 Unauthorized Schools

Web Summary : Pune Municipal Corporation has identified 13 unauthorized schools for the 2025-26 academic year. These schools are located in Bibvewadi, Yerwada, Kondhwa, Hadapsar, and other areas. Parents are advised against enrolling their children in these schools for the 2026-27 academic year.