शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro: भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती, वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्वतंत्र नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:56 IST

Pune Metro शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलिस ठाण्यासमोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोअरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट-शिवाजीनगर मार्गावरील भुयारी मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडल्याची घटना घडली होती

पुणे : स्वारगेट-शिवाजीनगर मार्गावरील भुयारी मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती व वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी महापालिका स्वतंत्र आणि सविस्तर नियमावली तयार करत आहे. बोरवेल खोदण्यासाठी भूजल विभागाची स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. केवळ बांधकाम परवानगी घेऊन बोरवेल खोदाई करता येणार नाही. पेठांमधील दाटीवाटीच्या भागात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मेट्रोला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलिस ठाण्यासमोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोअरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट-शिवाजीनगर मार्गावरील भुयारी मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडल्याची घटना घडली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पाण्याची गळती आढळल्यानंतर तत्काळ तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर महापालिका आणि मेट्रो प्रशासन सतर्क झाले असून पेठांमधील सुरू असलेल्या बांधकामांचे पुनरावलोकन करण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील पेठांचा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे मेट्रो प्रकल्प भूमिगत करण्यात आला होता. मात्र, आता भुयारी मार्गांच्या वर मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणीची कामे सुरू असल्याने बोगद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वतंत्र नियमावली महामेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा सहा किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी आहे. जमिनीखाली सुमारे १०० फूट खोल अंतरावर हा मेट्रोचा बोगदा असून त्याच्यावरील बाजूस काँक्रीटचे आवरण केलेले आहे. हा मार्ग प्रामुख्याने फडके हौदाच्या बाजूने पुढे मंडई आणि नंतर स्वारगेटकडे जातो. यातील बहुतांश भाग हा जुन्या पुण्याचा असून त्या ठिकाणी जुने वाडे आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत, तर काही ठिकाणी नव्याने बांधकामे सुरू आहे. या बांधकामांसाठी बोअरवेल घेतल्या जात आहेत. या नियमावलीत मेट्रो बोगद्यांच्या वर किंवा त्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम किंवा पुनर्बांधणी करण्यापूर्वी तांत्रिक तपासणी करणे.

बांधकाम करताना मेट्रो प्रशासनाची परवानगी घेणे, संरचनात्मक सुरक्षिततेचा अहवाल सादर करणे आणि कामादरम्यान तांत्रिक देखरेख ठेवणे याबाबतही विचार सुरू असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro: New rules for buildings above underground tunnels.

Web Summary : Pune is creating rules for rebuilding buildings above metro tunnels due to safety concerns. Borewell drilling requires hydrogeology department permission. Construction near metro lines necessitates structural safety reports and metro authority approval to avoid risks.
टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीSwargateस्वारगेटkatrajकात्रजPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPMRDAपीएमआरडीए