शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:57 IST

1 / 4
Rumble Strips Purpose: रस्त्यांवर ठिकठिकाणी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे पट्टे एकापाठोपाठ एक काढलेले असतात, त्यांनाच रंबल स्ट्रीप्स म्हणतात. हे पट्टे केवळ रस्ता छान दिवसा म्हणून किंवा शोभेसाठी नसतात, तर अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी बनवलेले असतात.
2 / 4
जेव्हा वाहन रंबल स्ट्रिप्सवरून जाते, तेव्हा गाडीमध्ये एक विशिष्ट प्रकारची कंपणे जाणवतात. तुम्हीही याचा अनुभव घेतला असेल. कंपणे जाणवण्याबरोबरच 'घड-घड' असा आवाजही येतो. जर चालकाला डुलकी येत असेल किंवा त्याचे ध्यान दुसरीकडे असेल, तर या आवाजामुळे आणि कंपनामुळे तो लगेच सावध होतो.
3 / 4
रंबल स्ट्रीप्स या शक्यतो पुढे येणाऱ्या धोक्याची किंवा अपघात होणार नाही, याची पूर्वकल्पना देण्यासाठीच असतात. शाळा, हॉस्पिटल, टोल नाका, रेल्वे क्रॉसिंग किंवा तीव्र वळण येण्यापूर्वी हे पट्टे बनवले जातात, जेणेकरून चालक गाडीचा वेग कमी करेल.
4 / 4
महामार्गांवर रस्त्याच्या कडेला किंवा दोन पदरी रस्त्यांवर रंबल स्ट्रीप्स असतात. रात्रीच्या वेळी किंवा धुक्यात रस्ता दिसत नसताना, गाडी रस्त्याखाली उतरू नये किंवा दुसऱ्या लेनमध्ये जाऊन धडकू नये म्हणून हे पट्टे दिशादर्शकासारखे काम करतात.