शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
13
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
14
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
15
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 07:03 IST

Petrol Diesel Price Today news: अवघ्या आठवड्याभरापूर्वीच केंद्र सरकारने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर लागोपाठ झालेली ही दुसरी दरवाढ आहे.

नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या (कच्चे तेल) किमतीत होत असलेल्या प्रचंड चढ-उतारामुळे देशांतर्गत इंधन दरांचा भडका उडाला आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर ८७ पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर ९१ पैशांनी महागले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच केंद्र सरकारने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर लागोपाठ झालेली ही दुसरी दरवाढ आहे.

मुंबईत पेट्रोल १०७.५९ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 94.08 रुपयांवर गेले आहे. 

दिल्ली-NCR मध्ये सीएनजी (CNG) देखील महागला!
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका आता सीएनजी वाहनधारकांनाही बसला आहे. दिल्ली आणि परिसरात (NCR) रविवारी सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाची वाढ करण्यात आली. दोन दिवसांतील ही दुसरी वाढ आहे. या नवीन वाढीमुळे दिल्लीत सीएनजी ८०.०९ रुपये प्रति किलो झाला आहे, तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर ८८.७० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

दरवाढीचे मुख्य कारण काय?
जागतिक तेल बाजारातील अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पार गेल्या आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक क्रूड पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम भारतावर होत आहे.

केंद्रीय मंत्र्यांचा दरवाढीवर बचाव
दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या इंधन दरवाढीचे समर्थन केले आहे. "पश्चिम आशियातील (मिडल ईस्ट) संकटामुळे अनेक देशांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. मात्र, त्या देशांच्या तुलनेत भारताने इंधनावरील दरवाढ बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवली आहे," असा दावा त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Fuel Prices Surge Again: Check Increased Rates in Mumbai, Pune

Web Summary : Fuel prices rise again due to global crude oil fluctuations. Petrol increased by 87 paise, diesel by 91 paise per liter. CNG prices also hiked in Delhi-NCR. Geopolitical tensions and supply chain disruptions are primary reasons. Minister defends controlled price hike compared to other countries.
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढFuel Crisisइंधन टंचाईPetrolपेट्रोलDieselडिझेलPetrol Pumpपेट्रोल पंपUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर