लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/मुंबई : जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत चलनावर मोठा दबाव निर्माण झाला. सोमवारी आंतरबँक विदेशी चलन बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ५४ पैशांनी कोसळून ९६.३५ या आतापर्यंतच्या सर्वाधिक नीचांकी पातळीवर आला. बाजार बंद होताना रुपया ९६.२० प्रति डॉलरवर बंद झाला.
सेन्सेक्स आधी कोसळला, नंतर सावरला
सोमवारी शेअर बाजार सुरुवातीस प्रचंड घसरला; मात्र नंतर तो सावरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एका टप्प्यावर १,१३४.७८ अंकांनी कोसळला होता. मात्र, शेवटच्या तासात आयटी, फार्मा शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे तो ७७.०५ अंकांच्या वाढीसह ७५,३१५.०४ अंकावर बंद झाला.
कच्चे तेल १११ डॉलरपार
सौदी अरेबिया, युएईमधील तेल क्षेत्रांवरील भीषण ड्रोन हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या. आशियाई बाजारात सोमवारी ब्रेंट क्रूड १११.५० डॉलर प्रति बॅरलवर, तर डब्लूटीआय क्रूड १०८.२० डॉलरवर पोहोचले.
चांदी २.७६ लाखांवर
केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर घातलेल्या ताज्या निर्बंधांमुळे चांदीचे दर १००० रुपयांनी वाढून प्रति किलो २,७६,००० रुपये झाले.
Web Summary : The rupee crashed to a record low of 96.35 against the dollar due to global uncertainty and rising crude oil prices. The stock market initially fell but recovered. Silver prices surged due to import restrictions, reaching ₹2,76,000 per kg.
Web Summary : वैश्विक अनिश्चितता और कच्चे तेल की बढ़ती कीमतों के कारण रुपया डॉलर के मुकाबले 96.35 के रिकॉर्ड निचले स्तर पर आ गया। शेयर बाजार शुरू में गिरा लेकिन बाद में संभल गया। आयात प्रतिबंधों के कारण चांदी की कीमतें बढ़कर ₹2,76,000 प्रति किलो हो गईं।