शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

By अजित मांडके | Updated: May 19, 2026 08:31 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतून १६ विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. १८ जूनला मतदान होऊन २२ जूनला मतमोजणी होणार आहे.

- अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून एक आमदार निवडून द्यायचा आहे. या मतदार संघावर यापूर्वी शिंदेसेनेचा वरचष्मा होता. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणानंतर आता भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे या मतदार संघावर आता भाजप उमेदवारीसाठी दावा करणार असल्याची चिन्हे आहेत. ठाणे-पालघर मतदार संघात १,०३० नगरसेवक असून भाजपचे ४४४ तर शिंदेसेनेचे ३२६ नगरसेवक आहेत. युतीत शिंदेसेना ही जागा भाजपला सहजासहजी सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतून १६ विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. १८ जूनला मतदान होऊन २२ जूनला मतमोजणी होणार आहे. ठाणे - पालघर स्थानिक स्वराज्य मतदार संघातून यापूर्वी शिंदेसेनेचे रवींद्र फाटक निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ ८ जून २०२२ मध्ये संपुष्टात आला. परंतु त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका न झाल्याने विधान परिषदेसाठी निवडणूक झाली नव्हती.

शिंदेसेनेचे ३२६ नगरसेवक असले तरी जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे २० नगरसेवक त्यांना मदत करू शकतील. त्यामुळे त्यांची संख्या ३४६ होईल. दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे ७१ नगरसेवक आहेत. भाजपबरोबर त्यांचे सध्या बिनसले आहे. त्यांची मते निर्णायक ठरतील. राष्ट्रवादी (अजित पवार)चे २९ नगरसेवक महायुतीच्या बाजूने असतील, अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडीला नगरसेवकांची मोठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. काँग्रेसचे ४७, राष्ट्रवादी (शरद पवार)चे ३८, उद्धवसेनेचे १८, समाजवादी पार्टीचे ६ व इतर काही नगरसेवकांची संख्या १५० पेक्षा अधिक होते. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिंदेसेनेला मदत केली होती. दुसरीकडे छोट्या पक्षांचे नगरसेवक कोणाला मतदान करणार, हे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

एकूण मतदार     १,०३०
भाजप    ४४४
शिंदेसेना + नीलेश सांबरे गट    ३४६
बहुजन विकास आघाडी    ७१
काँग्रेस    ४७
राष्ट्रवादी (शरद पवार)    ३८
राष्ट्रवादी (अजत पवार)    २९
उद्धवसेना    १८
मनसे    ६
माकप    ६
समाजवादी पार्टी    ६
एमआयएम    ५
कोनार्क विकास     ४
आघाडी (भिवंडी)
भिवंडी विकास आघाडी    ३
वंचित बहुजन आघाडी    २
साई पक्ष    १
अपक्ष    ९


महापालिका : ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार

नगरपालिका : कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, पालघर, डहाणू, जव्हार

नगरपंचायती : शहापूर, मुरबाड, वाडा, विक्रमगड, तलासरी, मोखाडा
 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2026Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा