India-Russia: रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभरातील 'तेल राजकारण' कमालीचे तापले आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये, यासाठी अमेरिका सातत्याने जगातील इतर देशांवर दबाव टाकत आहे. मात्र, भारताने या दबावाला बळी न पडता आपल्या राष्ट्रीय हिताशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने रशियन तेलावरील निर्बंधांमध्ये दिलेली तात्पुरती सूट संपली असली, तरी भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे भारत ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत स्वतंत्र आणि व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारताचा निर्णय व्यावसायिक गरजांवर आधारित
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, भारताची रशियाकडून होणारी तेल खरेदी कधीही अमेरिकेच्या सवलतींवर अवलंबून नव्हती. कच्च्या तेलाची खरेदी ही पूर्णपणे व्यापारी फायदे, बाजारस्थिती आणि देशाच्या गरजांनुसार केली जाते. तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा तुटवडा नसल्याचे सांगत भारतीय रिफायनऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा त्यांनी केला.
अमेरिकेची सवलत संपली, पण...
रशियाशी संबंधित काही तेल व्यवहारांसाठी अमेरिकेने तात्पुरती सूट दिली होती. मात्र या सवलतीची मुदत आता संपली आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, याचा देशातील तेलपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारताला रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल मिळत असल्याने देशाला आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे ही खरेदी कायम ठेवण्याच्या भूमिकेत भारत दिसत आहे.
रशिया भारताचा मोठा तेल पुरवठादार
२०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाने आशियाई देशांना कमी दरात तेल विक्री सुरू केली. भारताने या परिस्थितीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर रशियन तेल आयात सुरू केली. अहवालांनुसार, मे महिन्यात भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात दररोज सुमारे १९ लाख बॅरलपर्यंत पोहोचू शकते, जी विक्रमी पातळीच्या जवळ मानली जात आहे.
पर्यायी पुरवठ्याचीही तयारी
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, भारताकडे केवळ रशियावर अवलंबून राहण्याची वेळ नाही. देशाकडे अमेरिका, UAE, ओमान आणि इराक यांसारख्या देशांकडूनही तेल आयातीचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, देशांतर्गत मागणीत काही प्रमाणात नरमाई आणि स्पॉट मार्केटमध्ये वाढलेली उपलब्धता यामुळे सध्या कोणत्याही मोठ्या तेल संकटाची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.
Web Summary : Despite US pressure, India prioritizes national interests, continuing Russian oil imports. Commercial benefits and energy security drive the decision, unaffected by expiring US waivers. India diversifies sources, ensuring stable oil supply. Record imports are expected.
Web Summary : अमेरिका के दबाव के बावजूद, भारत राष्ट्रीय हित को प्राथमिकता देते हुए रूस से तेल का आयात जारी रखेगा. वाणिज्यिक लाभ और ऊर्जा सुरक्षा निर्णय को संचालित करते हैं. भारत स्रोतों में विविधता लाता है, स्थिर तेल आपूर्ति सुनिश्चित करता है. रिकॉर्ड आयात की उम्मीद है.