चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामातील घरच्या मैदानातील शेवटच्या सामन्यात धोनी खेळायला मैदानात उतरून चेन्नईकरांचा निरोप घेईल, अशी आशा होती. पण सामन्याआधी यासंदर्भात रंगलेल्या सर्व चर्चा फोल ठरल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीमय माहोल अन् चेपॉकवरील भावूक क्षण
चेन्नई सुपर किंग्सचा पहिला डाव संपल्यावर धोनीची मैदानात एन्ट्री झाली. त्याने आपल्या संघ सहकाऱ्यांसोबत मैदानात ग्रुप फोटो काढला. एवढेच नाही तर CSK च्या पराभवानंतरही मैदानात येलो जर्सीतील चाहते अगदी चातकाप्रमाणे त्याची चेपॉकवरील झलक पाहण्यासाठी थांबले. सामना संपल्यावर धोनीनं मैदानाला फेरी मारत (Lap Of Honour) चाहत्यांचा निरोप घेतला. यादरम्यान मीडिया फोटोग्राफर्ससोबत धोनीनं काढलेला सेल्फी, जुना सहकारी रैनाची घेतलेली भेट यासह चेपॉकवरील वातावरण धोनीयम झाल्याचे पाहायला मिळाले. खास गोष्ट म्हणजे हे सगळं घडतं असताना MS धोनीची पत्नी साक्षीही भावूक झाली होती. पण धोनीच्या चेहऱ्यावरील भाव अजिबात बदलला नाही.
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
२०२४ च्या हंगामात कॅप्टन्सी सोडली अन्...
MS धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र चाळिशीनंतरही तो IPL मध्ये सक्रिय खेळाडू म्हणून कायम राहिला. २०२४ हंगामापूर्वी त्याने CSK चे नेतृत्व सोडलं होतं. त्याआधी २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली CSK संघाने पाचवं विजेतेपद जिंकलं होतं. मात्र गेल्या तीन हंगामांपासून धोनी सतत फिटनेस समस्यांनी त्रस्त आहे. गुडघ्याची दुखापत, पोटऱ्यांतील त्रास अशा कारणांमुळे यंदाचा पूर्ण हंगाम त्याला बाहेर बसून पाहावा लागला.
अनकॅप्ड खेळाडूच्या म्हणून CSK सोबत कायम राहिला MS धोनी
धोनी हा अनकॅप्ड खेळाडूच्या म्हणून संघासोबत आहे. एखाद्या सामन्यात तरी तो मैदानात उतरेल, अशी अपेक्षा होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासाठी तो टीम बसमधून उतरला त्यावेळी त्याच्या हातात मॅच जर्सी दिसली. पण घरच्या मैदानातील शेवटचा सामना खेळण्यासाठी संघाचा भाग नव्हता. मिड इनिंगमध्ये तो मैदानात उतरला त्यावेळी स्टेडियममध्ये जल्लोष उसळला अन् शेवटी १९ वर्षांचा त्याचा प्रवास थांबणार असल्याचे संकेत मिळाले.
Web Summary : Despite a loss to Sunrisers Hyderabad, MS Dhoni captivated Chepauk. He took selfies, met Raina, and did a lap of honor, creating emotional moments for fans. Dhoni, who retired from international cricket in 2020 and left CSK's captaincy in 2024, remains a key player.
Web Summary : सनराइजर्स हैदराबाद से हार के बावजूद, एमएस धोनी ने चेपॉक में दर्शकों को मोहित किया। उन्होंने सेल्फी ली, रैना से मिले और सम्मान का चक्कर लगाया, जिससे प्रशंसकों के लिए भावुक क्षण बन गए। धोनी, जिन्होंने 2020 में अंतरराष्ट्रीय क्रिकेट से संन्यास ले लिया और 2024 में सीएसके की कप्तानी छोड़ दी, एक महत्वपूर्ण खिलाड़ी बने हुए हैं।