शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:09 IST

1 / 11
ट्विशा शर्मा आता या जगात नाही. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी तिने मृत्यूला कवटाळलं. तिच्या व्हॉट्सॲप चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये ते दु:ख स्पष्टपणे दिसत आहे, ज्याने तिला असं पाऊल उचलण्यास भाग पाडलं.
2 / 11
३१ वर्षांच्या आयुष्यात ट्विशा शर्माने ते सर्व काही साध्य केलं होतं, जे मिळवण्यात लोकांचं अर्ध आयुष्य निघून जातं. ती एक मॉडेल होती, अभिनेत्री होती, कंटेंट क्रिएटर होती आणि 'मिस पुणे' होती. यासोबतच ती योग ट्रेनर आणि उच्चशिक्षित महिला होती. तिने कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीही केली होती.
3 / 11
१२ मे २०२६ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पाच महिन्यांपूर्वी याच तारखेला म्हणजेच १२ डिसेंबर २०२५ रोजी ट्विशाचं वकील समर्थ सिंहशी लग्न झालं होतं. समर्थ हा भोपाळच्या निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांचा मुलगा आहे.
4 / 11
ट्विशा उच्चशिक्षित होती. तिने एप्रिल २०१४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बीबीए (BBA) पूर्ण केले होते. यानंतर तिने नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) मधून एमबीए (MBA) केलं होतं.
5 / 11
मॉडेलिंग आणि ॲक्टिंगसोबतच ट्विशाने जुलै २०१४ ते एप्रिल २०२० दरम्यान मुंबईतील 'फ्लेवर पॉट फूड्स'मध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं होतं. यानंतर ती 'जर्मन अकॅडमी ऑफ डिजिटल एज्युकेशन'मध्ये कम्युनिकेशन आणि ऑनबोर्डिंग मॅनेजर होती.
6 / 11
१२ मेच्या संध्याकाळी ट्विशा ब्युटी पार्लरमधून घरी आली होती. ती घरी नेहमीप्रमाणे टीव्ही पाहत होती, इतक्यात तिच्या आईचा फोन आला. फोनवर बोलत बोलत ती गच्चीवर गेली. काही वेळानंतर कॉल कट झाला आणि रात्री साडेदहाच्या सुमारास तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
7 / 11
कुटुंबाचे म्हणणं आहे की, शेवटच्या संभाषणादरम्यान ती खूप अस्वस्थ वाटत होती. इतक्या गंभीर प्रकरणात तातडीने कारवाई न केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. तिचा पती समर्थ सिंह फरार आहे.
8 / 11
ट्विशा शर्मा ही मूळची नोएडाची रहिवासी होती आणि तिचं लग्न १२ डिसेंबर २०२५ मध्ये गिरीबाला सिंह यांचा मुलगा समर्थ सिंह याच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच ट्विशाचा छळ सुरू झाला आणि तिचा दोनदा गर्भपात झाला असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
9 / 11
१२ मे २०२६ रोजी कटारा हिल्स येथील घरात तिचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. शवविच्छेदन (Post-mortem) अहवालात मृत्यूचं कारण गळफास असल्याचं म्हटलं असले, तरी तिच्या शरीरावर जखमा आणि मारहाणीच्या खुणा आढळल्याने हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे.
10 / 11
ट्विशा शर्माच्या आईने, ''आम्हाला न्यायाची कोणतीही अपेक्षा नाही. ट्विशा नाही, तर समर्थ स्वतः ड्रग्ज घ्यायचा आणि तिचा मानसिक छळ करायचा, तिला घाणेरड्या शिव्या द्यायचा' असं म्हटलं आहे.
11 / 11
ट्विशाच्या वडिलांनी समर्थला ड्रग्ज घेण्याबाबत विचारणा केली होती, याच कारणावरून तिच्या वडिलांना नाक घासून माफी मागण्यास भाग पाडलं गेलं होतं असंही सांगितलं.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिसmarriageलग्नdowryहुंडा