राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने काही महिन्यांपूर्वी नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचा करार संपवला. विधानसभा निवडणुकीत नरेश अरोरा यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून काम केले होते. आता त्यांच्या जागी प्रशांत किशोर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याची माहिती एबीपी या वृत्तवाहिनीने दिली आहे. मंगळवारी (१९ मे) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाल्याचेही वृत्त आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची मंगळवारी (१९ मे) सकाळी प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक पार पडली. ते यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) राजकीय रणनीतीकार आणि त्यांची कंपनी पक्षाचे काम पाहणार आहेत. १ जूनपासून ते काम सुरू करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीचे गुलाबी प्रचार मोहीम
राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी राहिली. त्यानंतर नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सकडे पक्षाच्या प्रचाराची रणनीती आखण्याची जबाबदारी देण्यात आली.
नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्स कंपनीचे सहसंस्थापक असून, त्यांनी इतर राज्यातही राजकीय रणनीतीकार म्हणून काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्यांनी गुलाबी मोहीम राबवली होती. लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने हा कलर निवडला गेला होता. पण, नंतर नरेश अरोरा यांच्यासोबतचे काम थांबवण्यात आले.
आता राज्यातील सर्वच पक्षांना २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यानुषंगाने तयारी सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्ष उभारणी आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काम हाती घेतले आहे.
Web Summary : NCP (Ajit Pawar) ended its contract with Design Box. Reportedly, Prashant Kishor may replace them as a strategist. A meeting occurred between Kishor, Sunetra Pawar, and Parth Pawar. He may start working June 1st, focusing on the upcoming 2029 elections.
Web Summary : राकांपा (अजित पवार) ने डिजाइन बॉक्स के साथ अनुबंध समाप्त किया। रिपोर्ट के अनुसार, प्रशांत किशोर रणनीतिकार के रूप में उनकी जगह ले सकते हैं। किशोर, सुनेत्रा पवार और पार्थ पवार के बीच बैठक हुई। वह 1 जून से काम शुरू कर सकते हैं, 2029 के चुनावों पर ध्यान केंद्रित करेंगे।