बिहारच्या बेतिया जिल्ह्यात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. जिल्हा प्रशासन, मानवी तस्करी विरोधी पथक आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या संयुक्त कारवाईत सहा अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी ऑर्केस्ट्रा चालक रामबाबू गुप्ता याच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई योगपट्टी ब्लॉकमधील शनिचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुआरवा गावात करण्यात असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
चाइल्ड हेल्पलाइन केंद्राचे जिल्हा समन्वयक आलोक कुमार यांनी सांगितले की, योगपट्टी ब्लॉकमधील शनिचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑर्केस्ट्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पाटणास्थित मुक्ती फाउंडेशनकडून मिळाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विविध संस्था आणि प्रशासकीय विभागांच्या मदतीने एक विशेष पथक तयार करून छापा टाकला. याप्रकरणी ऑर्केस्ट्रा चालक रामबाबू गुप्ता याच्यासह सुमारे सहा जणांना अटक करण्यात आली. तर, सहा अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली.
सहा मुलींची सुटका, एक मुलगी गर्भवती
सुटका केलेल्या मुलींपैकी पाच जणी पश्चिम बंगालच्या, तर एक बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींनी नोकरी देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांना अनैतिक कृत्यांसाठी भाग पाडले, अशी माहिती पीडित मुलींनी दिली. या कारवाईदरम्यान पथकाला एक गर्भवती अल्पवयीन मुलगीही आढळून आली, ज्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. सध्या सर्व मुलींना प्रशासकीय संरक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांचे समुपदेशन सुरू आहे.
पोलीस तपास सुरू
पोलीस अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करत असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.
Web Summary : Bihar police busted a sex racket disguised as an orchestra, rescuing six minor girls from West Bengal and Bihar. Authorities arrested six individuals, including the orchestra owner. Victims were lured with job promises and forced into prostitution. One rescued girl is pregnant.
Web Summary : बिहार पुलिस ने ऑर्केस्ट्रा की आड़ में चल रहे सेक्स रैकेट का भंडाफोड़ किया, पश्चिम बंगाल और बिहार की छह नाबालिग लड़कियों को बचाया। पुलिस ने ऑर्केस्ट्रा मालिक समेत छह लोगों को गिरफ्तार किया। पीड़ितों को नौकरी का वादा करके वेश्यावृत्ति के लिए मजबूर किया गया। एक लड़की गर्भवती है।