शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:29 IST

1 / 12
अमेरिका आणि इराण युद्धामुळे जगातील सर्वच देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परकीय चलन साठा वाचविण्यासाठी सर्वच देश आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल डिझेलच्या बचतीबरोबरच, सोन्याची खरेदी वर्षभरासाठी कमी करण्याचे अथवा आवश्यकता असेल तरच करावी, असे आवाहन केले आहे.
2 / 12
भारतीय जनतेत सोन्याची मागणी प्रचंड आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात करावी लागते. परिणामी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होते. सध्या देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या या आवाहनाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर, अशा परिस्थितीत, कोणत्या देशात सोन्याचा सर्वाधिक साठा ('सरकार आणि इतर...) आहे, यासंदर्भात जाणून घेऊयात.
3 / 12
खरे तर, सोन्याकडे समृद्धीचे प्रतिक म्हणून नेहमीच आदराने बघितले गेले आहे. यामुळे ज्या देशाकडे, सोन्याचा साठा जेवढा अधिक, तेवढीच त्या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट अथवा बलशाली मानली जाते.
4 / 12
जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा नेमका कोणत्या देशाकडे? असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा आपसूकच अमेरिका अथवा चीन हे दोन देश डोळ्यासमोर येतात. मात्र, संपूर्ण चित्र बघितल्यास, एक अशी आकडेवारी समोर येते, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल अथवा तुमची छाती अभिमानाने ५६ इंत फुगेल.
5 / 12
जागतिक पातळीवरील 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल' (WGC) च्या ताज्या अहवालाचा विचार करता, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या तिजोरीतील अथवा सरकारी सोन्याच्या साठ्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, या बाबतीत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेकडे ८,१३३.४६ मेट्रिक टन एवढे सोने आहे.
6 / 12
अमेरिकेचे हे सोने न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँक आणि फोर्ट नॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे. या अधिकृत यादीत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ८८०.५२ मेट्रिक टन सोन्यासह जगात आठव्या स्थानावर आहे.
7 / 12
मात्र आता खरी थक्क करणारी आकडेवारी तर पुढेच आहे. वैयक्तिक नागरिकांकडील अथवा मंदिरांकडील सोन्याचा विचार करता, वर्ल्ड गोल्ड काउन्सिल आणि असोचेम (ASSOCHAM) तसेच मॉर्गन स्टॅन्ले यांच्या आर्थिक विश्लेषणात्मक अहवालानुसार, जगातील सर्वाधिक वैयक्तिक सोने भारतातील जनतेकडे आणि मंदिरांमध्ये आहे.
8 / 12
यासंदर्भातील आकडेवारीचा विचार करता, भारतातील जनतेकडे, पारंपरिक आणि दागिन्यांच्या स्वरूपात जवळपास २५,००० ते ३४,६०० टन सोन्याचा साठा असण्याचा अंदाज आहे. या सोन्याचे एकूण मूल्य सुमारे ५ ट्रिलियन डॉल म्हणजे, अंदाजे ४१५ लाख कोटी रुपये, एवढे प्रचंड आहे. विशेष म्हणजे, भारताच्या GDP चा विचार करता, त्याहूनही अधिक.
9 / 12
विशेष म्हणजे, ब्लूमबर्ग आणि आयएमएफ (IMF) च्या आर्थिक अहवालानुसार, जगातील टॉपच्या १० देशांच्या बँकांचे संपूर्ण सरकारी सोने एकत्र केले, तरीही, भारतातील महिलांकडे आणि कुटुंबांकडे असलेले वैयक्तिक सोने त्याहून कितीतरी पटीने अधिक आहे.
10 / 12
जगातील एकूण सोन्याच्या साठ्याचा विचार करता, तब्बल ११ ते १३ टक्के सोने केवळ भारतातील सामान्य नागरिक आणि मंदिरांकडे आहे. हा आकडे सुमारे ३००००+ टन एवढा जातो.
11 / 12
अर्थात, 'सरकार, नागरिक आणि मंदिरे' अशा दोन्ही पातळ्यांवर एकूण सोन्याचा विचार केला जातो, तेव्हा भारत हा संपूर्ण जगात सर्वाधिक सोने असणारा अथवा बाळगणारा पहिल्या क्रमांकाचा देश ठरतो.
12 / 12
अर्थात, 'सरकार, नागरिक आणि मंदिरे' अशा दोन्ही पातळ्यांवर एकूण सोन्याचा विचार केला जातो, तेव्हा भारत हा संपूर्ण जगात सर्वाधिक सोने असणारा अथवा बाळगणारा पहिल्या क्रमांकाचा देश ठरतो.
टॅग्स :GoldसोनंMarketबाजारAmericaअमेरिकाchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी