शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अरे वा..! देवगड हापूस आंबा घेताना आता फसवणूक अशक्य, स्पेशल कोडद्वारे पारख…

By अजित घस्ते | Updated: March 18, 2025 19:37 IST

- बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी स्टिकर प्रणाली अंमलात

पुणे : देवगड हापूसच्या नावाने होणारी तोतयागिरी व बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी 'हापूस (अल्फोन्सो)' च्या भौगोलिक संकेत युनिक आयडीद्वारे जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर प्रणाली बनवली आहे. यामुळे आता नैसर्गिक उत्पादन असलेला खरा देवगड आंबा ओळखता येणार आहे. या युनिक आयडी कोड प्रणालीद्वारे देवगड आंब्यांची गोड चव ग्राहकांना चाखता येणार आहे.

देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर 'टॅपर प्रूफ युआयडी सील' सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नैसर्गिक देवगड आंबा ओळखता येणार आहे, अशी माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक सदस्य ॲड. ओंकार सप्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास युनिक स्टिकर लावणे बंधनकारक असेल आणि असे युआयडी असलेले आंबेच 'देवगड हापूस' किंवा 'देवगड अल्फोन्सो' म्हणून विक्री करता येणार आहे.

या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णतः बंद होईल. ग्राहकांना अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील, असा संस्थेने विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपल्याकडील आंबा ‘देवगड’चाच आहे का, हे तपासण्यासाठी ग्राहकांनी 91 9167 668899 या क्रमांकावर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फोटो पाठवावा.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

गेल्या तीन दशकांपासून इतर भागांतील निकृष्ट दर्जाचे आंबे सर्रास देवगड हापूस म्हणून विकले जात आहेत. त्यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, त्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणामदेखील होत आहेत. त्यामुळेच 'हापूस (अल्फोन्सो)' च्या जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर या नात्याने प्राप्त होणाऱ्या अधिकारांचा वापर करून संस्थेने हा युनिक कोट सक्तीचे करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ३०८ शेतकरी जोडले गेले असल्याचे, ओंकार सप्रे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMahabharatमहाभारतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसMangoआंबाMarket Yardमार्केट यार्ड