शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : मिनरल वॉटर व्यवसायात नफ्याचे आमिष; पुण्यात पेट्रोल पंप व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:53 IST

आरोपींनी त्यांना मिनरल वॉटर विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, अशी बतावणी केली.

पुणे : मिनरल वॉटर विक्री व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून दोघांनी एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची दोन कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे हडपसर परिसरातील हांडेवाडी भागात राहायला आहेत. आरोपी हे हडपसर भागात राहायला आहेत. आरोपींचे कपड्यांचे दुकान आहे. आरोपी आणि पेट्रोल पंप व्यावसायिक हे ओळखीचे आहेत. आरोपींनी त्यांना मिनरल वॉटर विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, अशी बतावणी केली.

त्यानुसार १७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्यात भागीदारी करार झाला. व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांच्याकडून एक कोटी ७८ लाख रुपये ७५ हजार रुपये घेण्यात आले. जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पाण्याच्या बाटल्या विकून मिळालेले ५५ लाख ४८ हजार रुपये आरोपींनी स्वत:च्या बँक खात्यात जमा करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंप व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक बाबर पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mineral water business lure: Two crore fraud on petrol pump owner.

Web Summary : Promising mineral water profit, two individuals defrauded a petrol pump owner of ₹2.34 crore in Pune. Police have registered a case against three accused involved in the fraudulent scheme. The investigation is ongoing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्या