शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: "दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:59 IST

Pune Crime news: पुण्यात एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. एका वर्षाच्या मुलीसाठी वाढदिवसाची पोस्ट लिहून कर्मचाऱ्यांना स्वतःचा फोटो स्टेट्‍सला ठेवला आणि भावपूर्ण श्रद्धांजली म्हणूनही एक पोस्ट केली आहे. 

"बाळा, मी पोलीस खात्यात नोकरीला आहे. जिथे वरिष्ठांची मनमानी चालते", अशी भावुक पोस्ट लिहून पुण्यात एक पोलीस कर्मचारी बेलत्ता झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहे. निखिल रणदिव असे बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने मोबाईल बंद करण्यापूर्वी स्वतःचा फोटो स्टेट्‍सला ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट केली. रणदिव यांच्या प्रकरणामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 

पुण्यातील यवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी निखिल रणदिवे हे ५ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली. त्यानंतर पाच पथके तयार करून शोध सुरू करण्यात आला आहे.  निखिल रणदिवे यांनी हे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून केल्याचे समोर आले आहे. 

रणदिवेंची लेकीसाठी भावुक पोस्ट 

पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. 

निखिल रणदिवे यांनी व्हॉट्सॲपवर मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोखाली त्यांनी लिहिले की, बाळा, आज तुझा पहिला वाढदिवस, खूप चांगल्या प्रकारे साजरा करायचा होता. पण, मी पोलीस खात्यात नोकरी आहे; जिथे वरिष्ठांची मनमानी चालते. दीदी तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा."

रणदिवे यांनी काही वेळाने दुसरा फोटो व्हॉट्सॲप स्टेटसला पोस्ट केला. हा फोटो त्यांचा स्वतःचाच होता. त्याखाली त्यांनी लिहिले होते भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानंतर रणदिवे यांनी त्यांचा मोबाईल बंद केला. तेव्हापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कोणते आरोप?

निखिल रणदिवे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, नारायण देखमुख यांनी त्यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला. मुलगी आजारी असताना आणि आता मुलीच्या वाढदिवसासाठी त्यांनी सुट्टी मागितली. तीही नाकारण्यात आली. त्यामुळे रणदिवे मानसिक तणावात होते. गेल्या वर्षभरापासून आपल्याला हुकुमशाही पद्धतीने वागणूक मिळत आहे. नेहमीच्या मानसिक छळाला कंटाळून मी हे पाऊल उचलत आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेले आहे. 

निखिल रणदिवे यांच्या पोस्टनंतर पुण्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे. रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा आरोप केला आहे. बापूराव दडस हे दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. 

पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली

निखिल रणदिवे यांचे स्टेट्‍स बघून कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, तो होऊ शकला नाही. त्यांचे भाऊ अक्षय रणदिवे यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. 

निखिल रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Cop Vanishes After Blaming Boss, Touching Birthday Post

Web Summary : Pune police officer Nikhil Randive disappeared after accusing his superior of harassment in a social media post before his daughter's birthday. A search is underway following a complaint to the Chief Minister.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस