Pune crime: मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख करून २६ लाखांचा गंडा; महाराष्ट्रभर ११ गुन्ह्यातील अट्टल भामटा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 18:46 IST2026-04-19T18:45:46+5:302026-04-19T18:46:17+5:30

Pune crime : आरोपीने गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर केला असून, त्याने आणखी किती जणांची अशा प्रकारे फसवणूक केली आ

Pune crime Rs 26 lakh fraud through identification from matrimonial site Attal Bhamta arrested in 11 crimes across Maharashtra | Pune crime: मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख करून २६ लाखांचा गंडा; महाराष्ट्रभर ११ गुन्ह्यातील अट्टल भामटा जेरबंद

Pune crime: मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख करून २६ लाखांचा गंडा; महाराष्ट्रभर ११ गुन्ह्यातील अट्टल भामटा जेरबंद

लोहगाव: मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेची २६ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नील वारुळे उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४, रा. अलिबाग, जि. रायगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर महाराष्ट्रभरात फसवणुकीचे तब्बल ११ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर, येरवडा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या फिर्यादी महिलेशी आरोपीने मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधला होता. आरोपीने आपले नाव स्वप्नील वारुळे असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. लग्न झाल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी पनवेलमध्ये प्लॉटमध्ये गुंतवणूक करूया, असे आमिष त्याने दाखवले.

गुंतवणुकीसाठी पैसे कमी पडत असल्याचे सांगून त्याने 'मिस विनीता कांदे' आणि 'प्रेम म्हात्रे' हे आपले नातेवाईक असून ते फायनान्स मॅनेज करतात, असा बनाव रचला. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी आरोपीने दिलेल्या बँक खात्यांवर एकूण २६ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, पैसे मिळताच आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.

आरोपीने गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर केला असून, त्याने आणखी किती जणांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस प्रशासनातर्फे आवाहन: नागरिकांनी मॅट्रिमोनिअल साईट्स किंवा सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तींना कोणतीही शहानिशा न करता आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अट्टल गुन्हेगार आणि गुन्ह्यांची मालिका

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला १५ एप्रिल २०२६ रोजी अटक केली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी नवी मुंबई (रबाळे, ए.पी.एम.सी.) माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीचे गुन्हे, ठाणे (खडकपाडा) फसवणुकीचे गुन्हे, मुंबई (दिंडोशी, व्ही.पी. रोड, एन.एम. जोशी मार्ग) विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल. रायगड (अलिबाग) आणि सांगवी (पुणे) येथेही फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. 

Web Title : पुणे: मैट्रिमोनियल साइट घोटाला, ₹26 लाख ठगे; आदतन अपराधी गिरफ्तार।

Web Summary : पुणे में एक मैट्रिमोनियल साइट के माध्यम से एक महिला से ₹26.5 लाख की धोखाधड़ी करने वाले एक ठग को गिरफ्तार किया गया, जिसने शादी और निवेश के अवसर का वादा किया था। आरोपी पर महाराष्ट्र में पहले से ही 11 धोखाधड़ी के मामले दर्ज हैं, विश्वास हासिल करने और धन निकालने के लिए नकली रिश्तेदारों का इस्तेमाल किया।

Web Title : Pune: Matrimonial site scam nets ₹26 lakhs; serial fraudster arrested.

Web Summary : A conman was arrested in Pune for defrauding a woman of ₹26.5 lakhs via a matrimonial site, promising marriage and investment opportunities. The accused, with 11 prior fraud cases across Maharashtra, used fake relatives to gain trust and siphon funds.