शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीसाठी पोलिस ठाण्यात बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आले ? पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:09 IST

आरोपीसाठी पोलिस ठाण्यात बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आले ? पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे - येरवड्याच्या चौकात लघुशंका करत हटकणाऱ्यांना अश्लिल हावभाव करणाऱ्या गौरव आहुजाने साताऱ्यात कराडमध्ये जात पोलिसांना सरेंडर केले आहे. आहुजाने सकाळी दारु प्यायली होती, मग रात्री उशिरा सरेंडर का केले? दारुचा अंमल नष्ट करण्यासाठी हे केले असल्याचे आरोप होत आहेत. अशातच सर्व माध्यमांचे आहुजाकडे लक्ष असताना ही जेव्हा घटना घडली तेव्हा गाडीत दारुची बाटली घेऊन बसणारा त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला पोलीस ठाण्यात खाण्यासाठी त्याच्या मित्रांनी बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आणल्याचे समोर आले आहे.बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सलच्या मुद्द्यावर आता पोलीस उपायुक्त  हिंमत जाधव यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'काल सकाळी 7.30 वाजता शास्त्रीनगर भागात तरुणाकडून अश्लील वर्तन केले गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता काल भाग्येश ओसवाल याला अटक केली होती. मुख्य आरोपी गौरव अहुजा याला सातारा येथून ताब्यात घेतलं आहे. या पुण्यातल्या दोन्ही आरोपींना आता आम्ही अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. वैद्यकीय प्राथमिक अहवाल आमच्याकडे आला आहे. पुढील तपास सुरु आहे. आरोपी कस्टडीत असेपर्यंत नियमाने ज्या गोष्टी आहेत जो भत्ता कायद्याप्रमाणे दिला जातो तोच भत्ता त्यांना देण्यात येईल बाहेरची कुठलीही गोष्ट त्यांना खायला देण्यात येणार नाही.

गौरव आहुजा साताऱ्यात का सरेंडर झालागौरव आहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण पूर्णतः नाहीसे होत नाही, असे आपचे नेते व या प्रकरणात उघडपणे बोलणारे विजय कुंभार यांनी म्हटले होते. कारमध्ये त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल देखील होता, त्याच्या हातात दारुची बाटली दिसत आहे. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि आहुजा हा गाडीही चालवत होता. तरीही या दोघांचा मेडिकल रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. यात जर आहुजा मद्यधुंद होता हे सिद्ध झाले नाही तर त्याला मोठा फायदा मिळू शकतो. यामुळे त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले असावेत अशी शंका आता पुणेकरांना येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYerwadaयेरवडा