पोलिसांना गुंगारा देत होता, पण एक चूक महागात पडली..! घायवळ टोळीतील गुरुदत्त साळवे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 18:33 IST2026-05-10T18:32:51+5:302026-05-10T18:33:20+5:30

नीलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत; आठ महिन्यांपासून देत होता पोलिसांना गुंगारा

pune crime news he was giving a false report to the police, but one mistake cost him dearly gurudutt Salve of the Ghayval gang arrested | पोलिसांना गुंगारा देत होता, पण एक चूक महागात पडली..! घायवळ टोळीतील गुरुदत्त साळवे अटकेत

पोलिसांना गुंगारा देत होता, पण एक चूक महागात पडली..! घायवळ टोळीतील गुरुदत्त साळवे अटकेत

पुणे : मकोका कारवाईनंतर आठ महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नीलेश घायवळ टोळीतील गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली. गुरुदत्त गुणाजी साळवे (वय ४४, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कोथरूड पोलिसांनी घायवळ याच्यासह साथीदारांविरोधात आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर साळवे पसार झाला होता.

गेले आठ महिने तो गुंगारा देत होता. गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक त्याच्या मागावर होते. साळवे सांगाेला परिसरातील निजामपूर गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. साळवे याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title : पुलिस को चकमा दे रहा गैंगस्टर एक गलती से पकड़ा गया।

Web Summary : घायवल गिरोह का गुरुदत्त साल्वे मकोका कार्रवाई के बाद आठ महीने से पुलिस को चकमा दे रहा था। अपराध शाखा इकाई तीन ने उसे सांगोला के निजामपुर गांव में खोज निकाला और गिरफ्तार कर लिया। अब वह कोथरुड पुलिस की हिरासत में है।

Web Title : Gangster dodging police for months caught due to one mistake.

Web Summary : Gurudutt Salve, from the Ghaywal gang, was arrested after evading police for eight months following a MCOCA action. Crime Branch Unit Three tracked him down to Nizampur village in Sangola and apprehended him. He's now in the custody of Kothrud police.