शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पोर्टर ॲपचा गैरवापर उघड; डिलिव्हरी पद्वारे एमडीचा पुरवठा; शिरूरमध्ये २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 13:14 IST

Pune Crime - गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी वाहनांसह एकूण २१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

शिरूर : शिरूर शहर व तालुक्यात मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आता डिलिव्हरी ॲपचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ४७ ग्रॅम एमडीसह सुमारे २१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांना अटक केली आहे.

विशाल मारुती मोर (रा. बाफणामळा, शिरूर), प्रतीक संतोष लंघे (रा. करडे, ता. शिरूर) आणि मिथुन विजयपाल सिंग (रा. रामलिंग रोड, सवतमाळी नगर, शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेला न्हावरा फाटा ते बाबुरावनगर मार्गावर संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाली. शिवसाईलीला मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी गाड्यांमध्ये काहीजण एमडीची विक्री करत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. तपासादरम्यान आरोपींकडून ४७.६० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी वाहनांसह एकूण २१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

चौकशीदरम्यान या आरोपींकडून एमडी विक्रीसाठी ‘पोर्टर’ या डिलिव्हरी ॲपचा वापर केल्याचे समोर आले आहे. ग्राहकांकडून ऑर्डर घेतल्यानंतर ड्रग्ज पॅक करून डिलिव्हरी ॲपमार्फत ते पोहोचवले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या ॲपच्या माध्यमातून ड्रग्ज घेणाऱ्या ग्राहकांचा शोध सुरू असून, त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, विभागीय अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक निरीक्षक राहुल गावडे, अभिजित सावंत, शुभम चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Porter App Used to Supply MD Drugs; Seizure

Web Summary : Pune police busted a drug racket in Shirur, where the Porter app was used for MD delivery. Three arrested, ₹21.52 lakh seized.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीShirurशिरुर