आईस्क्रीम विक्रेत्याने १४ वर्षीय मतिमंद मुलीचा केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:36 IST2026-05-05T13:36:35+5:302026-05-05T13:36:57+5:30

Pune crime - मुळशी तालुक्यातील घटनाः शोधमोहीम राबवत आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले

Pune crime Ice cream vendor kills 14-year-old mentally retarded girl | आईस्क्रीम विक्रेत्याने १४ वर्षीय मतिमंद मुलीचा केला विनयभंग

आईस्क्रीम विक्रेत्याने १४ वर्षीय मतिमंद मुलीचा केला विनयभंग

कोळवण : मुळशी तालुक्यातील एका गावात आईस्क्रीम विक्रीच्या बहाण्याने फिरणाऱ्या विक्रेत्याने १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना बुधवारी (दि. २९) दुपारी घडली.

या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आईस्क्रीम विकण्यासाठी आलेल्या विक्रेत्याकडे पीडित मुलगी आपल्या लहान चुलत बहिणीसह आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी पिंटू शिवकुमार (सध्या रा. सूस, ता. मुळशी, जि. पुणे; मूळ रा. उत्तर प्रदेश) याने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने मुलीला जवळ घेत

तिचा विनयभंग केला. या घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करत तातडीने घरी धाव घेतली व पालकांना सर्व प्रकार सांगितला. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पळून गेला. मात्र, संतप्त पालक आणि शेजाऱ्यांनी परिसरात शोधमोहीम राबवत आरोपीला पकडून पौड पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पौड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ तसेच पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title : आइसक्रीम विक्रेता ने 14 वर्षीय मंदबुद्धि लड़की से छेड़छाड़ की

Web Summary : मूलशी में, एक आइसक्रीम विक्रेता ने 14 वर्षीय मंदबुद्धि लड़की के साथ छेड़छाड़ की। आरोपी पिंटू शिवकुमार को स्थानीय लोगों ने पकड़कर पौड पुलिस को सौंप दिया। आरोपी के खिलाफ बीएनएस और पोक्सो एक्ट की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है।

Web Title : Ice Cream Vendor Molests 14-Year-Old Mentally Challenged Girl

Web Summary : In Mulshi, an ice cream vendor molested a 14-year-old girl with a mental disability. The accused, Pintu Shivkumar, was caught by locals and handed over to the Paud police. A case has been registered under relevant sections of the BNS and POCSO Act.