Pune crime: तुला पळवून नेईन, तुझे आई-बाबा काय ...; पुण्यात मुलीला धमकी देणारा तरुण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:57 IST2026-04-23T17:56:38+5:302026-04-23T17:57:04+5:30

Pune crime - सोशल मीडियावरून ओळख; अल्पवयीन मुलीला पळवण्याची धमकी देणारा तरुण अटकेत 

Pune crime: I will kidnap you, what about your parents...; Young man arrested for threatening to kidnap girl in Pune | Pune crime: तुला पळवून नेईन, तुझे आई-बाबा काय ...; पुण्यात मुलीला धमकी देणारा तरुण अटकेत

Pune crime: तुला पळवून नेईन, तुझे आई-बाबा काय ...; पुण्यात मुलीला धमकी देणारा तरुण अटकेत

पुणे : सोशल मीडियातून ओळख करून घेऊन तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: अल्पवयीन युवतींना आमिष दाखवून पळवून नेल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. एका आईने आपल्या १५ वर्षीय मुलीच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवल्याने पुढील अनर्थ टळल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर गेल्या ५ महिन्यांपासून ओळख असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडून पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. अयान नसीम अहमद मलिक (वय १९, रा. थिटेनगर, खराडी, मुळ अथर कॉलनी, कोतवाली, बिजनोर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५पासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १५ वर्षाची मुलगी व आरोपी अयान मलिक यांची सोशल मीडियावर ओळख झाली. अयान मलिक हा मूळचा उत्तर प्रदेशामधील राहणारा आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी तो पुण्यात आला. अयान खराडीमधील एका सलूनमध्ये काम करतो.

अयान याने या युवतीशी सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली. त्यांचे सोशल मीडियावर बोलणे सुरू झाले. तो युवती राहते त्या परिसरात तिच्या घराजवळ येऊ लागला. त्याने वारंवार युवतीचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. एकदा तिचा हात पकडून तो तिला म्हणाला, ‘तु माझ्या सोबत चल नाही तर तुला पळवून नेईन. तुझे आई-बाबा काय करतात ते बघू,’ या प्रकाराने युवती घाबरून गेली. युवतीच्या आईला तिची चलबिचल लक्षात आली. तिने युवतीचे सोशल अकाउंट चेक केले. तिला अयानविषयी विचारले. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या आईने खराडी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून अयान मलिक याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी बिडवे करत आहेत.

Web Title : पुणे: नाबालिग लड़की को धमकी, पीछा; अपहरणकर्ता गिरफ्तार।

Web Summary : पुणे पुलिस ने एक 19 वर्षीय युवक को ऑनलाइन मिली 15 वर्षीय लड़की का पीछा करने और धमकी देने के आरोप में गिरफ्तार किया। उसने लड़की को साथ चलने से इनकार करने पर अपहरण करने की धमकी दी। लड़की की मां ने सोशल मीडिया पर उत्पीड़न का पता लगाया और शिकायत दर्ज कराई।

Web Title : Pune: Teen threatened, stalked; abductor arrested for harassment.

Web Summary : Pune police arrested a 19-year-old for stalking and threatening a 15-year-old girl he met online. He threatened to abduct her after she refused to go with him. The girl's mother discovered the harassment on social media and filed a complaint.