Pune Crime रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी; दगड लागल्याने मोठा भाऊ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:24 IST2026-05-06T18:23:03+5:302026-05-06T18:24:09+5:30
Pune Crime : रस्त्याच्या मोजणीवरून आणि घराच्या पडवीच्या हक्कावरून सख्ख्या भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली

Pune Crime रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी; दगड लागल्याने मोठा भाऊ जखमी
वडगाव आनंद ( पुणे जि. ) : पिंपळवंडी भटकळवाडी येथे सामाईक रस्त्याच्या मोजणीवरून आणि घराच्या पडवीच्या हक्कावरून सख्ख्या भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादात लहान भावाने डोक्यात दगड घातल्याने जालिंदर बबन लेंडे (वय ५७) हे गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी (दि. २ मे) दुपारी अडीचच्या सुमारास जालिंदर लेंडे आणि त्यांचे भाऊ नवनाथ व विष्णू लेंडे यांच्यात सामाईक रस्ता सोडण्यावरून शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी जालिंदर यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केली.
यावेळी नवनाथ याने जवळच असलेला दगड जालिंदर यांच्या डोक्यात मारला, तर विष्णू याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी जालिंदर लेंडे यांच्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी नवनाथ बबन लेंडे आणि विष्णू बबन लेंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार पंकज पारखे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.