Pune Police: पुणे शहरात मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा; ३ दिवसांत १७१ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:15 IST2026-04-27T16:14:39+5:302026-04-27T16:15:58+5:30
या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्ते सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांमध्ये जबाबदार वाहनचालकाची जाणीव निर्माण करणे हा आहे

Pune Police: पुणे शहरात मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा; ३ दिवसांत १७१ जणांवर कारवाई
पुणे : शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली. २४ ते २६ एप्रिलदरम्यान तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत तब्बल १७१ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक विभागाने शहरातील विविध ठिकाणी एकूण ३३ नाकाबंदी पॉइंट उभारून वाहनांची तपासणी केली. या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने चालकांची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईसह पुढील कायदेशीर प्रक्रियादेखील केली.
या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्ते सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांमध्ये जबाबदार वाहनचालकाची जाणीव निर्माण करणे हा आहे. तसेच, मद्यपान करून वाहन चालवणे टाळावे, कारण यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.