Pune Accident: सासवडजवळ मद्यधुंद चालकाची दोन दुचाकींना धडक, दोन जण ठार तर पती-पत्नी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:26 IST2026-04-19T14:25:19+5:302026-04-19T14:26:29+5:30

Pune accident - सासवड गावाच्या हद्दीतील काळूबाई मंदिराजवळ वळणाचा अंदाज न आल्याने कारचालकाने सलग दोन मोटारसायकलस्वारांना जोरदार धडक दिली.

Pune Accident A drunken driver collided with two bikes near Saswad, two people were killed and a husband and wife were injured | Pune Accident: सासवडजवळ मद्यधुंद चालकाची दोन दुचाकींना धडक, दोन जण ठार तर पती-पत्नी जखमी

Pune Accident: सासवडजवळ मद्यधुंद चालकाची दोन दुचाकींना धडक, दोन जण ठार तर पती-पत्नी जखमी

सासवड : सासवड-वीर रस्त्यावरील सासवडनजीक काळूबाई मंदिराजवळ मद्यधुंद कार चालवणाऱ्या चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत पांगारे गावातील दोन जण जागीच ठार झाले. तर दुसऱ्या दुचाकीवरील पिंपळे गावातील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. जखमींवर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत प्रत्यक्षदर्शी पांगारे गावचे शिवसेना प्रमुख प्रकाश काकडे यांनी सासवड पोलिसांत तक्रार दिली आहे.

भरधाव कार (एमएच. ४७, सीडी. ७७०८) ही वीर गावाकडून सासवडकडे येत होती. सासवड गावाच्या हद्दीतील काळूबाई मंदिराजवळ वळणाचा अंदाज न आल्याने कारचालकाने सलग दोन मोटारसायकलस्वारांना जोरदार धडक दिली. यात रवींद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेंद्र संपत काकडे (वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती-पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख (वय ३०, रा. ॲमेनोरा हडपसर पुणे, मूळ रा. नेहापुजा कोऑपरेटिव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव पश्चिम मुंबई) याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील रवींद्र काकडे आणि महेंद्र काकडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर दोघांवर सासवडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करत आहेत.

Web Title : पुणे: सासवड में नशे में धुत चालक ने दो को मारा, दो घायल

Web Summary : सासवड के पास, एक नशे में धुत चालक ने दो मोटरसाइकिलों को टक्कर मार दी, जिससे पांगारे के दो निवासियों की मौत हो गई। पिंपल का एक जोड़ा गंभीर रूप से घायल हो गया और उसका इलाज चल रहा है। पुणे के ड्राइवर को गिरफ्तार कर लिया गया है।

Web Title : Pune: Drunk Driver Kills Two, Injures Two in Saswad Accident

Web Summary : Near Saswad, a drunk driver hit two motorcycles, killing two Pangare residents. A couple from Pimple was seriously injured and is receiving treatment. The driver from Pune has been arrested.