शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक भरतीवरून विद्यापीठात झडताहेत आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 09:58 IST

सदर खोट्या व बदनामीकारक वृत्तांकनामुळे व त्याच्या प्रसारणामुळे विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाहक मलिन होत आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीमध्ये कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या मथळ्याखाली एका वाहिनीने वृत्त प्रसारित केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पत्रक काढून हे वृत्त खाेटे असल्याचे नमूद केले. त्याचबराेबर विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधीने चुकीची माहिती पसरवल्याचा ठपला ठेवला. दुसरीकडे संशाेधक विद्यार्थ्यानेही या प्रकरणाचा खुलासा करत नाहक बदनामी केल्याचे सांगून विद्यापीठ प्रशासनावरच ॲट्राॅसिटीचा गुन्हा नाेंदवण्याची मागणी केली आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या मते, ‘पुणे विद्यापीठात प्राध्यापक व्हायचंय मग १ कोटी रुपये तयार ठेवा’ या मथळ्याखाली वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध केलेले वृत्तांकन निखालस खोटे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १११ शिक्षकी पदांच्या भरतीप्रक्रियेत महाघोटाळा झाला असून सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी रुपये १ कोटीची लाच मागितली जात असल्याचे खोटे कथन करण्यात आले आहे.

विद्यापीठाची हेतुपुरस्सर बदनामी करणारे हे वृत्तांकन आहे. सदर खोट्या व बदनामीकारक वृत्तांकनामुळे व त्याच्या प्रसारणामुळे विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाहक मलिन होत आहे. सदर आरोपांचे जाहीर खंडन विद्यापीठ प्रशासन करत असून अशा प्रकारे विद्यापीठाची प्रतिमा नाहक मलिन करणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध करत आहे. सदर भरती प्रक्रियेमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांनी व इतर समाजघटकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एटीआर’ आणि ‘एपीआय’च्या नावाखाली नऊ हजारांपैकी सहा हजार उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद केले आहे. त्याविरोधात आवाज उठवल्याचा राग मनात धरून विद्यापीठ प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. प्राध्यापक पदभरती पारदर्शक व्हावी, ही मागणी करणे गुन्हा आहे का? हजारो पात्र दलित बहुजन उमेदवारांना ‘एटीआर’च्या नावाखाली बाद केले? याविरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे का? थोडक्यात प्रश्न विचारले म्हणून माझा रोहित वेमुला करण्याचे षडयंत्र विद्यापीठ प्रशासनाने रचले आहे. हा प्रकार ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा आहे. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्रकटन मागे घेऊन खुलासा केला नाही तर कुलगुरू, प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, कायदेशीर सल्लागार आणि सहायक कुलसचिव जनसंपर्क विभाग यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत तक्रार देणार आहे.  - राहुल ससाणे, विद्यार्थी प्रतिनिधी

English
हिंदी सारांश
Web Title : Pune University Faculty Recruitment: Allegations and Counter-Allegations Erupt

Web Summary : Pune University faces allegations of corruption in faculty recruitment, denied by administration. A student representative alleges wrongful disqualification of candidates and threatens legal action. The university refuted the claims, condemning defamation and urging stakeholders to disregard the misinformation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र