शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन महिलांची सुटका, मॅनेजरसह मालकांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:29 IST

पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पुढे आले

पुणे : आनंदपार्क, वडगावशेरी येथील एका कॉम्प्लेक्समध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चंदननगर पोलिसांनी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली, तर ‘स्पा’च्या मॅनेजरसह मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस शिपाई वर्षा नामदेव सावंत यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘स्पा’ची मॅनेजर रिया रंजीत शर्मा (२१, रा. चंदननगर), स्पा मालक संदीप त्रिपाठी (रा. वडगाव शेरी) आणि राहुल जाधव (रा. पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील आनंद पार्कमधील शैलेश कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सृष्टी स्पा आहे. या स्पाचे मालक त्रिपाठी आणि जाधव हे दोघे आहेत. ते मॅनेजर रिया शर्मा हिच्यामार्फत या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत होते. याबाबत पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पुढे आले. पोलिसांनी बुधवारी (दि. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. शर्मा हिच्यामार्फत दोन महिलांना जादा पैशांचे प्रलोभन दाखवून आरोपींनी त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून पैसे मिळवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चंदननगर पोलिस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकProstitutionवेश्याव्यवसायWomenमहिलाMONEYपैसा