लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय; आंबेगाव परिसरात पोलिसांचा छापा, ४ तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:53 IST2026-05-13T16:51:48+5:302026-05-13T16:53:03+5:30

पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली, त्यानंतर पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकत कारवाई केली

Prostitution by women in lodge; Police raid in Ambegaon area, 4 young women rescued | लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय; आंबेगाव परिसरात पोलिसांचा छापा, ४ तरुणींची सुटका

लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय; आंबेगाव परिसरात पोलिसांचा छापा, ४ तरुणींची सुटका

पुणे: गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने आंबेगाव परिसरातील लॉजमध्ये छापा टाकून चार पीडित तरुणींची सुटका केली. या प्रकरणी एका एजंटला अटक करण्यात आली आहे. सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. मुळज, ता. उमरगा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात आंबेगावपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला पुणे-सातारा रस्त्यावरील आंबेगाव बुद्रूक येथे असलेल्या लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत लॉजमध्ये आणलेल्या चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच आरोपी सचिन गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : पुणे: लॉज पर छापा, वेश्यावृत्ति का पर्दाफाश; चार महिलाएं मुक्त

Web Summary : पुणे पुलिस ने आंबेगांव के एक लॉज पर छापा मारकर चार महिलाओं को वेश्यावृत्ति से मुक्त कराया। एक एजेंट, सचिन गायकवाड़ को गिरफ्तार किया गया है। मानव तस्करी विरोधी दस्ते ने सूचना पर कार्रवाई करते हुए छापे से पहले अवैध गतिविधि की पुष्टि की। आगे की जांच जारी है।

Web Title : Pune: Raid on Lodge Exposes Prostitution; Four Women Rescued

Web Summary : Pune police raided an Ambegaon lodge, rescuing four women forced into prostitution. An agent, Sachin Gaikwad, has been arrested. The anti-human trafficking cell acted on a tip-off, confirming the illegal activity before the raid. Further investigations are underway.