शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पोस्ट अ‍ॅण्ड टेलिकॉम : कर्मचारी भरती, बांधकाम खर्चात अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 6:00 AM

सांस्कृतिक संकुलाच्या बांधकाम खचार्ची मिळेना बिले खर्चाची

ठळक मुद्दे१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१८ कालावधीच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालात ताशेरे

विशाल शिर्के -  पुणे :  दि पुणे पोस्ट अ‍ॅण्ड टेलिकॉम को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील कर्मचारी भरतीमधे अनियमितता असल्याचा ठपका चाचणी लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. संस्थेने बालेवाडी येथे उभारलेल्या सांस्कृतिक संकुलाचा बांधकाम खर्च, कायदेशीर सल्ल्यासाठी झालेल्या मोठ्या खर्चाचा मेळ लागत नसल्याचे गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अ‍ॅ सहकार विभागाने १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१८ कालावधीच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालात संस्थेच्या कामकाजावर लेखापरीक्षक सी. बी. गव्हाणकर यांनी ताशेरे ओढले आहेत. विनातारण कर्ज प्रकरणामधे काही कर्जदारांवर वसुलीसाठी कोणतीही कारवाई न करणे, कर्जप्रकरणी जामीनदार न घेणे, थकबाकी असूनही ताळेबंदात थकबाकी न दाखविणे अशा गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. तसेच, २०१४-१५मधे २ लिपिक आणि एका शिपाई पदाची भरती करण्यात आली. त्यासाठी जाहिरात, मुलाखत अशी प्रक्रिया राबविण्यात आली नाही. तसेच, नियुक्ती आदेश देखील तपासणीवेळी उपलब्ध करुन देण्यात आले नाहीत. या शिवाय २०१७-१८च्या भरतीत एक नेमणूक तर तत्कालीन संचालक मनोहर बरके यांच्या मुलाची करण्यात आली. त्यातही नियुक्ती प्रक्रिया राबवली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुण्यात बालेवाडी येथे संस्थेने सांस्कृतिक भवन उभारले आहे. त्यासाठी जमीन ७.४२ आणि बांधकामावर ७.९७ कोटी रुपये खर्च झाले. तर, नोंदणी आणि मुद्रांक खर्च २८ लाख १२ हजार असा १६ कोटी २५ लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला. बांधकामासाठी ७.९७ कोटी रुपये खर्च कसा झाला, याची बिले उपलब्ध होऊ शकली नाहीत. तसेच, पीएमआरडीच्या ५० लाख रुपयांचे चलनही तपासणीसाठी उपलब्ध झाले नसल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ------------------कायदेशीर बाबींवरील अनाकलनीय खर्चसंस्थेने २०१३ ते २०१८ या कालावधीमध्ये कायदेशीर सल्लागार, टॅक्स ऑडिट अशा विविध कारणांसाठी के. के. काशीद यांना ९,५०,३४५ रुपये अदा केले. मात्र, टॅक्स ऑडिट रिपोर्टवर ए. आर. अभंग, आर. एल. अभंग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे काशिद यांना रक्कम देण्याचे प्रयोजन समजत नाही. अ‍ॅड. श्रीकांत कानेटकर यांना ९ फेब्रुवारी २०१८ रोजी ६५ हजार रुपये दिले आहेत. मात्र, त्याची बिले तपासणीसाठी उपलब्ध झाली नसल्याने हा खर्च संस्थेचा आहे, की नाही याचा बोध होत नसल्याचा आक्षेप अहवालात नोंदविला आहे.000अ‍ॅ 

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिसfraudधोकेबाजी