शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

संथ कामाबद्दल ठेकेदाराला दंड

By admin | Updated: July 3, 2014 05:39 IST

सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे

पुणे : सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. महापालिकेच्या मुदतीत हे काम पूर्ण होणार नसल्याने ठेकेदाराला प्रतिदिन २००० रुपयांप्रमाणे एकूण १५ लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने उड्डाणपुलाच्या धीम्या गतीसाठी केलेली ही पहिलीच कारवाई असून, येत्या डिसेंबर २०१४ पूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. भारती हॉस्पिटल ते चव्हाणनगर कमान असा १२१५ मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यासाठी ४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चरला २८ डिसेंबर २०११ ला ३० महिन्यांत उड्डाणपूल उभारण्याची मुदत दिली होती. त्यानंतर शंकर महाराज मठाजवळ जागेची अडचण असल्याने ५७ कोटी ७८ लाख रुपयांचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. ठेकेदाराने उड्डाणपुलाचे काम जुलै २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, काही दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम संथ सुरू असल्याची तक्रार नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या कामांची पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले होते. दरम्यान, आयुक्त विकास देशमुख, अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला, नगरसेवक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, राजेंद्र शिळीमकर, श्रीनाथ भिमाले, सुवर्णा पायगुडे, मोहिनी देवकर, अस्मिता शिंदे यांनी उड्डाणपुलाची पाहणी आज केली. (प्रतिनिधी)